Next
मुलुंड येथे काव्य मैफल व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
मिलिंद जाधव
Wednesday, December 12, 2018 | 11:22 AM
15 0 0
Share this article:

मुलुंड : आपले विचार कवितेच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचावे, साहित्याची आवड निर्माण व्हावी आणि नवकवींना विचारमंच उपलब्ध व्हावा या हेतूने मुलुंड येथील मराठा मंडळ आणि सरस्वती वाचनालय यांच्या विद्यमाने नवोदितांची काव्य मैफल व निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा बक्षीस वितरण सोहळा मुलुंड येथील सांस्कृतिक केंद्रात उत्साहात झाला.

कार्यक्रमाचे अध्यस्थान मराठा मंडळाचे अध्यक्ष रमेश शिर्के यांनी भूषविले. या वेळी जेष्ठ कवी आणि ‘झपूर्झा’चे संपादक दत्तात्रय सैतवडेकर, कवी अशोक लोटणकर, प्रा. डॉ. अलका कुलकर्णी, प्रा. भास्कर मयेकर, सरचिटणीस अजय खामकर, वाचनालय प्रमुख वसंत भोसले, वाचनालय निमंत्रक शंकर दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

या काव्य मैफिलीत सुरेखा गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. भाग्यश्री तेंडोलकर यांनी द्वितीय, तर शिल्पा भोसले आणि शालिनी काशीकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. निबंध स्पर्धेत रुचिता शिंदे, अपर्णा पवार आणि साहिल धनकुटे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. हर्ष विचारे, दीक्षा वैती, ऋतिका माळी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. गट क्रमांक दोनमध्ये साक्षी ब्रीद, गायनी पांडव आणि वेदश्री वडशिंगकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. सागर हांडे, प्रतीक्षा आवटे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. गट क्रमांक तीनमध्ये संध्या यादव-प्रकाशवाडकर यांनी प्रथम, सुमन याडकीकर यांनी द्वितीय आणि अशोक बेलापूरकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. अमृता यादव आणि हरिश्चंद्र सावंत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी कवयित्री सुरेखा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘माणसाचे जीवन खूप सुंदर आहे आणि कवितेतून माणसाचे जीवन फुलते, सामाजिक संदेश आणि प्रेरणा मिळते. आजच्या स्त्रीचे अस्तित्व कशा प्रकारचे आहे हेच मी माझ्या ‘अस्तित्व’ या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी कवितेच्या माध्यमातून स्त्रीचे अस्तित्व मांडले आहे, तसे प्रत्येकाने मांडणे गरजेचे आहे. घराला घरपण हवे असेल, तर प्रेम, माया, जिव्हाळा, एकोपा, आदर या गोष्टी सर्वांनी जपायला हव्यात.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search