Next
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत योग दिन साजरा
BOI
Saturday, June 22, 2019 | 05:27 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थीनींनी ॐकार, प्रार्थना, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान आणि विविध योगासने यांची प्रात्यक्षिके करून दाखविली.

या कार्यक्रमात व्यवस्थापक मंडळाचे अधिकारी, शाखा प्रमुख, कर्मचारी, सेवक वर्ग आणि शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी असे एकूण ११०० लोक सहभागी झाले होते. संस्थेच्या तेजस्विनी हेल्थ क्लबकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

योग शास्त्राचा प्रचार व्हावा आणि जास्तीत जास्त स्त्रियांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगासनांचा अंतर्भाव करून निरोगी राहावे, यासाठी क्लबतर्फे २४ जून ते २४ जुलै या कालावधीत फक्त स्त्रियांसाठी योगासनांचे मोफत वर्ग सुरू केले जाणार आहेत. हे वर्ग सोमवार ते शुक्रवार दुपारी चार ते पाच या वेळेत होतील.  

नाव नोंदणीसाठी संपर्क : ०२०-२५४७ ८२११ / ८६६९० ९६४२२
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search