Next
ठाणे येथे आधुनिक रेडिओलॉजी निदान सेवा
प्रेस रिलीज
Monday, May 21 | 01:07 PM
15 0 0
Share this story

ठाणे : महानगरपालिकेतर्फे क्रस्ना डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने ठाण्यातील नागरिकांसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल (सीएसएमएच) येथे आधुनिक सीटी आणि एमआरआय स्कॅन सुविधेची सुरुवात करत असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.

शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी या रुग्णालयात झालेल्या एका कार्यक्रमात ठाण्यातील नागरिकांसाठी या सेवांचे लोकार्पण केले. यामुळे आता ठाणे जिल्ह्यात आधुनिक सीटी आणि एमआरआय रेडिओलॉजी निदान सुविधा देणारे ‘सीएसएमएच’ हे पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे.

या सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्पाअंतर्गत ‘क्रस्ना’ने जीई हेल्थकेअरच्या वेदनारहित स्तन चाचणी, मोकळा श्‍वास, सूईरहित, हालचालमुक्त स्कॅन्स आणि शांततापूर्ण स्कॅन, १.५ टेस्ला सिग्ना, ऑप्टिमा ६६० या सुविधा दिल्या आहेत.

याप्रसंगी ‘क्रस्ना’च्या व्यवस्थापकीय संचालक पल्लवी जैन म्हणाल्या, ‘ठाणे महापालिकेच्या दूरदृष्टीसाठी आणि ठाणेकरांना परवडणार्‍या दरात सर्वोत्कृष्ट सेवा देण्याच्या त्यांच्या बांधिलकीसाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. यात सेवापुरवठादार म्हणून जबाबदारी पाहणे आणि त्यांचा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमचे तंत्रज्ञान भागीदार जीई हेल्थकेअर यांच्यासोबत ठाणे जिल्हा आणि आसपासच्या भागात उच्च दर्जाची आरोग्यसेवा पुरवता येईल, यावर आमचा विश्‍वास आहे."

जीई हेल्थकेअरच्या दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनीकांत गोलागुंटा म्हणाले, "क्रस्ना डायग्नोस्टिक त्यांचे अध्यक्ष श्री. राजेंद्र मुथा यांच्या नेतृत्वांतर्गत महाराष्ट्रात पीपीपींच्या माध्यमातून परवडणारी हेल्थकेअर सुविधा आणण्यामध्ये अग्रस्थानी राहिली आहे. या प्रकल्पात क्रस्ना डायग्नोस्टिकचे वैद्यकीय भागीदार असल्याचा आम्हाला आनंद आहे. निदान आणि उपचारांचे धोरण यात सीटी आणि एमआरआयचा महत्त्वाचा वाटा असतो. या प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान पहिल्यांदाच उपलब्ध झाल्याने ठाणेकरांना आता अधिक वेगवान, अधिक चांगल्या आणि रुग्णांच्या सोयीच्या निदान सेवा उपलब्ध होतील आणि त्यामुळे अर्थातच आरोग्यविषयक अधिक सकारात्मक परिणाम मिळतील.’

दर्जेदार आरोग्यसेवा पुरवता यावी यासाठी जीई हेल्थकेअर आपल्या ‘पीपीपी’ भागीदारांच्या माध्यमातून भारतातील अनेक राज्य सरकारांच्या साथीने सक्रिय कार्य करत आहे. आजघडीला, १७ राज्यांमधील ‘क्रस्ना’च्या १५० हून अधिक कार्यरत केंद्रांसह पीपीपीअंतर्गत भारतातील सर्वाधिक व्यापक व्यवसाय पाया आहे. जीई हेल्थकेअर आणि क्रस्ना डायग्नोस्टिक यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा, तामिळनाडू, गुजरात आणि जम्मू काश्मिर या राज्यांमध्ये २०११पासून पीपीपी प्रकल्पांमध्ये यशस्वी भागीदारी राखली आहे.

‘जीई हेल्थकेअर’बाबत :
जीई हेल्थकेअरकडून जगभरात वाढीव पोहोच, सुधारित दर्जा व अधिक परवडणार्‍या दरातील आरोग्यसेवा यांची मागणी पूर्ण करण्यासाठी बदलात्मक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि सेवा दिल्या जातात. मेडिकल इमेजिंगपासून, सॉफ्टवेअर आणि आयटी, पेशंट मॉनिटरिंग आणि निदान ते औषध शोध, जैवऔषधात्मक उत्पादन तंत्रज्ञान आणि कामगिरी सुधारणा उपाययोजना इथपर्यंत अनेक बाबतीत जीई आरोग्यसेवा वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या रुग्णांपर्यंत उत्तम आरोग्यसेवा पोहोचवण्यास मदत करते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link