Next
साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेतर्फे गीतमंच सीडीचे वाटप
BOI
Wednesday, June 26, 2019 | 05:44 PM
15 0 0
Share this article:मालवण :
साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा स्व. प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चालू वर्ष ‘प्रकाशवर्ष २०१९’ म्हणून साजरे करीत आहे. या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मालवण तालुक्यातील ‘कथामाले’शी संलग्न असलेल्या १०० प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये गीतमंचाचे सूर उमटविण्यासाठी ‘एक सूर एक ताल’ या सीडीचे वाटप उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. 

या सीडीमध्ये कदम कदम बढाए जा, बलसागर भारत होवो, हम होंगे कामयाब, बहु असोत सुंदर संपन्न की महा, उधळीत शतकिरणा अशा प्रकारची गाणी समाविष्ट आहेत. ‘प्रकाशवर्ष २०१९’च्या निमित्ताने कथाकथन स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी कथांची पुस्तके लेखन, कथा तंत्र आणि मंत्र मार्गदर्शन, रुग्णांना अन्नदान, निसर्ग निरीक्षण सहल इत्यादी कार्यक्रम मालवण शाखा राबविणार आहे. त्याचे नियोजन २३ जून रोजी झालेल्या कथामाला सहविचार सभेमध्ये करण्यात आले. या वेळी माधव गावकर यानी संगीत व जीवनातील आनंद याबाबत आपले विचार मांडले. कथामालेच्या उपक्रमातून साने गुरुजींची विविध गोड गाणी मुलांपर्यंत पोहोचल्यामुळे शाळा-शाळांत ‘एक सूर एक ताल’ नक्कीच पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी कथामालेबरोबरच गीतमंचाचा उपक्रम जास्तीत जास्त प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये उत्स्फूर्तपणे राबवण्याचे आवाहन केले. 

सभेला कथामालेचे सुमारे ८० सभासद उपस्थित होते. अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी ‘प्रकाशवर्ष २०१९’च्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करून विविध उपक्रम उत्साहाने पार पाडण्याचे आवाहन केले. या वेळी व्यासपीठावर सुगंधा गुरव (केंद्रप्रमुख आचरा), विजय चौकेकर (मुख्याध्यापक, शाळा आंबेरी नं. १), बाबाजी भिसळे (अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, आचरा), चंद्रशेखर हडप, बबनराव पडवळ आदी कथामाला सदस्य उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search