Next
स्मार्टकिड्स प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ध्वजवंदन
BOI
Friday, August 17 | 02:52 PM
15 0 0
Share this story

हिमायतनगर : शहरातील बजरंग चौकातील स्मार्टकिड्स प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ७२व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव सकवान यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सर्व विद्यार्थी आणि उपस्थितांनी राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजास वंदन केले. 

या वेळी नंदु अप्पा बंडेवार, डॉ. दिलीप पाटील, डॉ. कदम, डॉ. रावते, डॉ. शेवाळकर, विनोद आरेपल्लू, डॉ. ढगे, डॉ. कदम, भिसीकर, पालक संस्थेचे संचालक डॉ. दिगंबर वानखेडे, पंकज बंडेवार, आशिष सकवान, प्रफुल्ल मुधोळकर, शिवाजी उत्तरवार, सुनील माळवी, बाळू, रामेश्वर गड्डमवार आदी मान्यवर आणि शिक्षक उपस्थित होते. 

या वेळी स्मार्टकिड्स प्री-प्रायमरी स्कूलमधील चिमुकल्यांनी देशभक्तिपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील मॅडम यांनी केले. उपस्थितांचे आभार मुधोळकर मॅडम यांनी मानले.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link