Next
कीर्तनसंध्येत उलगडणार १८५७पासूनचा इतिहास
प्रेस रिलीज
Wednesday, December 13 | 06:13 PM
15 0 0
Share this story

चारुदत्त आफळेबुवारत्नागिरी : रत्नागिरीत या वर्षीच्या कीर्तनसंध्या महोत्सवात १८५७पासून १९२०पर्यंतचा ऐतिहासिक कालखंड राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळेबुवा उलगडणार आहेत. कीर्तनसंध्या परिवारातर्फे १३ डिसेंबरला पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. येत्या ३ ते ७ जानेवारी २०१८ या काळात हा महोत्सव होणार आहे.

रत्नागिरीत सुरू असलेल्या कीर्तनसंध्या उपक्रमाचे यंदाचे सातवे वर्ष आहे. गेल्या सात वर्षांत संभाजी महाराज, शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, पेशवाईतील मराठशाहीची देशव्यापी झुंज, स्वराज्याकडून साम्राज्याकडे, १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध या विषयांवर कीर्तने झाली. यावर्षी क्रांतीपर्वाचा दुसरा भाग म्हणजेच १८५७ ते १९२० या कालखंडातील इतिहास कीर्तनाद्वारे मांडला जाणार आहे.

कीर्तनाच्या पूर्वरंगात लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या गीतारहस्यावरचे विवेचन आफळेबुवा करणार आहेत. उत्तररंगात १८५७ ते १९२० या कालावधीतील लोकमान्य टिळक, चापेकर बंधू, महात्मा फुले, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, मदनलाल धिंग्रा, बिपिनचंद्र पाल, खुदीराम बोस, फडके, बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी कार्याचा आलेख मांडला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी इतिहासाच्या शिक्षणाची ही पर्वणी आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे. महोत्सवात हेरंब जोगळेकर (तबला), मधुसूदन लेले (हार्मोनियम), राजा केळकर (पखवाज), उदय गोखले (व्हायोलिन), उदयराज सावंत (ध्वनिव्यवस्था) यांची साथसंगत लाभणार आहे.

चारुदत्तबुवा आफळे यांचे वडील गोविंदबुवा आफळे यांच्या शताब्दीच्या निमित्ताने एक संकेतस्थळ सुरू करण्यात येणार असून त्याचा प्रारंभ कीर्तनसंध्या महोत्सवात होईल. महोत्सवाच्या देणगी सन्मानिका अवधूत जोशी, नितीन नाफड, उमेश आंबर्डेकर, गौरांग आगाशे, रत्नाकर जोशी, योगेश हळबे आणि मकरंद करंदीकर यांच्याकडे उपलब्ध होणार आहेत.

कालावधी : तीन ते सात जानेवारी २०१८
वेळ : सायंकाळी सहा ते रात्री दहा
स्थळ : प्रमोद महाजन क्रीडा संकुल, आठवडा बाजार, रत्नागिरी.

संपर्क :
अवधूत जोशी : ९०११६ ६२२२०
नितीन नाफड : ९५०३९ ४६६१७
उमेश आंबर्डेकर : ९४२३२ ९२४३७
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link