Next
चमचम चांदणं गगनात
BOI
Wednesday, May 16 | 10:00 AM
15 0 0
Share this story

लहान मुलांच्या भावविश्वात शिरून, त्यांचे अंतरंग जाणून घेऊन हितगूज करणे ही एक अवघड गोष्ट असते. सुमित्रा साठे यांनी या पुस्तकात तसा प्रयत्न केला आहे. वेगवेगळ्या विषयांवरच्या या छोट्या लेखांमधून त्यांनी लहानांशी संवाद केला आहे. मातृमहिमा या लेखात त्यांनी आईचे प्रेम, त्याग कष्ट यांची जाणीव करून दिली आहे, तर विवेकानंद आणि देह उजळो जग उजळो हे दोन्ही लेखही उच्च विचारांची महती सांगणारे आहेत.

फराळाची मज्जा हा लेख फाराळासारखाच चविष्ट आहे. आपले सण, उत्सव, आपली संस्कृती यांची माहिती त्यांनी काही लेखांतून अगदी सोप्या भाषेत गप्पा मारत करून दिली आहे. पर्यावरणाविषयी लिहिताना त्या अधिक संवेदनशील होतात. हिरवे सोयरे, पानांचा हट्ट, थेंब हे लेख त्याची साक्ष देतात. गणितावरचे लेखही मुद्दाम वाचावेत असे.

प्रकाशक : व्यास क्रिएशन्स्
पाने : १३६
किंमत : १६० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link