Next
अनगाव जिल्हा परिषद शाळेत रंगले विद्यार्थ्यांचे कविसंमेलन
मिलिंद जाधव
Tuesday, March 12, 2019 | 12:41 PM
15 0 0
Share this story



भिवंडी : शालेय जीवनापासून साहित्यविषयक ज्ञान वाढीस लागावे व आपली बोली भाषा जतन व्हावी या उद्देशाने भिवंडी तालुक्यातील अनगाव जिल्हा परिषद शाळेत पाचवी व सहावीच्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे कविसंमेलन मुख्याध्यापक माधव गुरव यांच्या अध्यक्षतेखाली  घेण्यात आले.

या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सोनाली गायकर, पंचायत समिती सदस्या ललिता जोशी, शिक्षिका वैष्णवी गव्हाळे, सुनिता पाटील, विलास वर्मा यांसह पालक उपस्थित होते. या प्रसंगी शिक्षकांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या संमेलनात विद्यार्थ्यांनी स्वलिखित कविता सादर केल्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी कविता, गप्पा, प्रश्नोत्तरे, गद्य, पद्य, नाट्यावलोकन, लोकगीत, चारोळी, यमक असा निखळ व मनमोकळा साहित्यविषयी संवाद साधला.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link