Next
ललित प्रभाकर साकारणार ‘गोपाळ जोशी’
‘आनंदीबाई जोशी’ यांच्यावर आधारित जीवनपटाचा टीझर प्रकाशित
BOI
Monday, January 14 | 05:48 PM
15 0 0
Share this story


मुंबई : सध्या बॉलीवूड असो वा मराठी चित्रपटसृष्टी सगळीकडे ट्रेंड दिसतोय तो ‘बायोपिक’चा अर्थात जीवनपटांचा. २०१९मधील पु. ल. देशपांडे यांच्यावर आलेल्या ‘भाई’ या बहुचर्चित चित्रपटानंतर आता भारतातील पहिल्या महिला डॉक्टर ‘आनंदीबाई जोशी’ यांच्या जीवनावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट येत असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रकाशित करण्यात आला आहे. 

ललित प्रभाकर‘झी स्टुडिओ’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात गोपाळ जोशी यांची स्त्री शिक्षणाविषयीची भूमिका आणि त्याला समाजातून झालेला विरोध यावर भाष्य करण्यात आले आहे. अभिनेता ललित प्रभाकर हा गोपाळ जोशी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून ललितचा लूकदेखील समोर आला आहे. गोपाळ जोशी यांच्या लूकमध्ये ललित अगदी चपखल बसत असल्याच्या प्रतिक्रीया माध्यमांतून नोंदवण्यात येत आहेत. 

दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाच्या कथानकात गोपाळ जोशी यांच्याशी वयाच्या दहाव्या वर्षी लग्न केलेल्या आनंदीबाई, गोपाळरावांनी आपल्या पत्नीला आपण लग्नानंतर आपल्या पद्धतीने शिकवू अशी आनंदीबाईंच्या वडिलांना घातलेली अट आणि त्यानंतर मग त्यांचे लग्न, समाजाच्या विरोधाला न जूमानता गोपाळ जोशी यांनी आनंदीबाईंना दिलेले शिक्षण या सर्व घटनांचा पट उलगडला आहे. ललित प्रभाकरसोबत आनंदीबाईंच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री असेल, हे मात्र अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. 

‘एका ध्येयवेड्या जोडप्याची असामान्य गोष्ट’, असा उल्लेख चित्रपटाच्या टीझरमध्ये केलेला आहे. येत्या १५ फेब्रुवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link