Next
अतर्क्य
BOI
Monday, April 16 | 11:18 AM
15 0 0
Share this story

‘कधी कधी स्वप्नांमध्ये दिसणारे अशक्य कोटीतील खेल मन उघड्या डोळ्यांसमोर मांडू लागतं आणि मग अतर्क्य वाटणाऱ्या घटनाही तर्कसंगत वाटू लागतात.’ लेखक संदीप दांडेकर आपल्या कथालेखनामागची भूमिका स्पष्ट करतात. एकूण १३ गुढकथांचा हा संग्रह आहे. चमत्कारावर आधारित गुढातून रंजन करणाऱ्या या कथा आहेत. ‘मानसकन्या’, ‘दत्तप्रासद’, ‘आत्महत्या’सारखी कथा आधुनिक काळात घडते, तर ‘वापर’सारख्या कथेचा कालखंड प्राचीन आहे.

या कथेत गूढरम्यता असली, तरी ‘चंदुला उजेडापेक्षा काळोखात वावरणंच जास्त सोयींच पडत असे. काळोखात त्याच्या सर्व संवेदना तीक्ष्ण होत असत.’ ‘पराभव आणि मानहानीचे सावट अजीनही त्यांच्या मनावर पसरलेलं होतं. आणि आत्ता वृद्धपकाळामुळे ते सावट अधिकच गडद झालं होतं.’ ‘मनं एक झालेली असतात तेव्हा शब्दांची गरज संपते’, असे सार्वकालिक चिंतनही आढळते.

प्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन्स
पाने : २०४
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link