Next
‘भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी दक्षता महत्त्वाची’
प्रेस रिलीज
Wednesday, December 13 | 06:29 PM
15 0 0
Share this story

द्क्षता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेले बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक आर.के.गुप्ता, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आर. पी. मराठे, निवृत्त आयपीएस अधिकारी रवीन्द्रनाथ पाटील व बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत

पुणे :  भ्रष्टाचारमुक्त भारत साकारण्यासाठी सर्वांनी दक्षता बाळगणे आवश्यक असल्याचे मत  बँक ऑफ महाराष्ट्रचे  व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आर. पी. मराठे यांनी व्यक्त केले. बँकेच्यावतीने  येथील लोकमंगल इमारतीतील मुख्य कार्यालयात ‘माझे ध्येय – भ्रष्टाचारमुक्त भारत’ या विषयावर आधारित एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यात  कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.  

या वेळी बांग्लादेश ग्रामीण बँकेचा संदर्भ देत सायबर गुन्हेगारीचा चौफेर आढावा  घेत आर. पी. मराठे म्हणाले, ‘३.६६ लाख नागरिकांनी केंद्रीय दक्षता आयोग पुरस्कृत शपथ घेतली, हे लक्षात घेण्याजोगे आहे. प्रत्येक नागरिक जागरूक होत असतानाच आपण भ्रष्टाचार- मुक्त प्रशासनासारखे मोठे आश्वासन पूर्ण करण्याच्या आणखी जवळ जायला हवे. आम्ही नागरिकांना दक्ष राहाण्याची आणि कायम प्रामाणिकपणाप्रती बांधिलकी जपण्याची विनंती करतो.’ बँकेच्या वतीने  लोकांना भ्रष्टाचार- मुक्तसंबंधित पद्धतींविषयी तसेच त्याबाबत माहिती देण्यासाठी काय करावे याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले होते. 

या वेळी बँकेचे कार्यकारी संचालक, आर. के. गुप्ता यांनी बँकांच्या महत्त्वाच्या भूमिकेकडे लक्ष वेधले. ‘फसवणूक झाल्यास बँकेची प्रतिष्ठा पणाला लागते. फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकानेच आपल्या कामात जास्त काळजीपूर्वक लक्ष घालणे महत्त्वाचे आहे.’असे गुप्ता यांनी सांगितले.
याच संदेशाचा पुनरूच्चार करत कार्यकारी संचालक ए. सी. राऊत म्हणाले, ‘आजच्या वातावरणात प्रत्येकाने स्वतःशी प्रामाणिक राहाणे गरजेचे आहे, मात्र त्याचवेळेस इतरजणही प्रामाणिकपणे काम करत आहेत, हे पाहिले पाहिजे.’

केपीएमजीच्या फॉरेन्सिक सायबर सुरक्षा विभागाचे सीईओ आणि निवृत्त आयपीएस अधिकारी  रवींद्रनाथ पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. ते म्हणाले, ‘दक्षता ही केवळ भ्रष्टाचारापुरतीच मर्यादित असता कामा नये, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अंतर्गत आणि बाह्य दक्षता बाळगणे आवश्यक आहे.’ 
व्हिजिलन्स विभागाचे डीजीएम एम. व्ही. मंगळवेढेकर  यांनी दैनंदिन कामकाजात दक्ष राहाण्याचे महत्त्व विशद केले. 
विविध स्पर्धांच्या विजेत्यांना गौरवण्यात आले. मुख्य दक्षता अधिकारी, सी. व्ही. वेंकटेश यांनी दक्षता सप्ताहादरम्यान घेतल्या गेलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link