Next
शिवशरण यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
BOI
Friday, March 16, 2018 | 02:19 PM
15 1 0
Share this story

अनवली न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एम. एम. शिवशरण यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ग्रामस्थ व प्रशालेतर्फे सपत्नीक सत्कार करताना बाळासाहेब भोसले, पोपट भोसले, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, बाळासाहेब पाटील, जगन्नाथ शिवशरण, बबन पाटील आदी.

सोलापूर : शाळेच्या भौतिक सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणारे अनवली (ता. पंढरपूर) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एम. एम. शिवशरण यांचा ग्रामस्थ व प्रशालेतर्फे सेवानिवृतीनिमित्त नुकताच सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब पाटील होते.
 
या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे भंडारा जिल्ह्याचे शिक्षणधिकारी जगन्नाथ शिवशरण, स्थानिक शाळा मंडळ सदस्य औदुंबर डीसले, शिवाजी शेंडे, रोपळे गावचे सरपंच दिनकर कदम, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विलास भोसले, विलास (ल.) भोसले, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, रोपळे गावातील शाळेचे माजी मुख्याध्यापक एम. जे. चौधरी, यशवंत विद्यालयाचे वरिष्ठ लिपीक शामराव बागल, रोपळे विकास प्रतिष्ठानचे संचालक अर्जुन भोसले, जालिंदर ओव्हाळ, शिक्षणप्रेमी बबन पाटील, सीताराम शिंदे, सुब्राव कदम, तोफिक शेख, नितीन घोडके, अशोक बंगाळे, तानाजी ननवरे, चंद्रकांत मलपे, प्रदीप भोसले, शेकू भंडारे, शिवाजी वगरे, वल्लभ बारले, माजी मुख्यध्यापक श्री. धुरूपे, माजी पर्यवेक्षक महादेव जगधने आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात ग्रामस्थ व प्रशालेतर्फे शिवशरण व त्यांची पत्नी बबीता यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक शिवशरण यांनी मनोगतात रयत शिक्षण संस्थेत प्रामाणिकपणे सेवा करून अनेक आदर्श विद्यार्थी घडवले असल्याचे नमूद केले. या वेळी त्यांचे विद्यार्थी डॉ. सुजित शिवशरण आणि डॉ. स्वप्नाली भोसले यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम शेजाळ यांनी केले. सूत्रसंचालन संकेत डीसले व विद्या ढोले या विद्यार्थांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्‌’ने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष मोरे, गणेश मोरे, धनाजी कोळी, शिक्षणप्रेमी बबन पाटील आदींनी परिश्रम घेतले.
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link