Next
नाशिकमधील तेरा महाविद्यालयांना प्रत्येकी दोन कोटीचे अनुदान
BOI
Friday, September 28, 2018 | 12:40 PM
15 0 0
Share this article:

नाशिक : सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत देशातील विविध महाविद्यालयांना विकासासाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यात महाराष्ट्रातील दीडशे महाविद्यालयांचा समावेश असून, नाशिक जिल्ह्याच्या १५ तालुक्यांमधून १३ महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या शिक्षण खात्याने दर वर्षीप्रमाणे महाविद्यालय आणि विद्यार्थी विकासासाठी अनुदान मंजूर केले आहे. महाविद्यालयात भौतिक सुविधा, तसेच शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे अनुदान दिले जाते. देशातील ४७२ महाविद्यालयांना अनुदान मिळणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट अशी, की नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील विविध शैक्षणिक संस्थांच्या अखत्यारीत येणाऱ्या महाविद्यालयांपैकी तेरा महाविद्यालयांची यासाठी निवड झाली.

ही आहेत ती महाविद्यालये...
व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे दिंडोरी महाविद्यालय, मराठा विद्याप्रसारक संस्थेची सिन्नर, नांदगाव, सिडको व सटाणा येथील महाविद्यालये, महात्मा गांधी विद्यामंदिरांतर्गत मालेगाव कॅम्प येवला महिला महाविद्यालय, मालेगाव कॅम्प पंचवटी महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर कॉलेज, मनमाड महाविद्यालय, लासलगावचे एन. व्ही. पी. मंडळ महाविद्यालय
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search