Next
‘होंडा’तर्फे केरळ पूरग्रस्त ग्राहकांसाठी मोफत सेवा
प्रेस रिलीज
Monday, September 03, 2018 | 03:10 PM
15 0 0
Share this article:

गुरूग्राम : पुराचा फटका बसलेल्या केरळला मदतीचा हात देण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने आज राज्यातील सर्व होंडा टू व्हीलर ग्राहकांसाठी मोफत सर्व्हिस मोहीम व विशेष एक्स्चेंज लाभ देण्याची घोषणा केली आहे.

ग्राहकांच्या पूरग्रस्त वाहनांना मदत करण्यासाठी केरळमधील ऑथराइज्ड डीलर नेटवर्क सक्रिय करण्यात आले आहे आणि त्यांना मोफत लेबर चार्जेस ही सेवा दिली जाईल व इंजिन ऑइलचा खर्च कंपनी उचलेल (मर्यादित कालावधीसाठी सवलत); तसेच पूरग्रस्त वाहनाच्या बदल्यात नवे होंडा वाहन बदलून घेण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना दोन हजार रुपयांपर्यंत विशेष एक्स्चेंज बोनस योजना उपलब्ध केली जाईल.

या उपक्रमाविषयी बोलताना ‘होंडा मोटरसायकल’चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिनोरु काटो म्हणाले, ‘केरळमध्ये सध्या प्रचंड आव्हाने आहेत आणि राज्यातील लोकांच्या वाहतुकीच्या गरजा पूर्ण करून त्यांचे जीवन पूर्वपदावर आणण्याच्या प्रयत्नांमध्ये ‘होंडा’ही सहभागी होणार आहे. केरळमधील रहिवाशांना शून्यातून पुन्हा उभे राहावे लागणार असल्याने ‘होंडा’ने या योगदानाद्वारे या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवला आहे.’

वाहनाच्या मोफत तपासणीसाठी ग्राहकांना नजिकच्या ऑथराइज्ड नेटवर्कलाही भेट देता येऊ शकते. दूरवरच्या एकाकी भागांतील पूरग्रस्त वाहने लवकर ठीक करण्यासाठी, केवळ केरळमधलेच नाही, तर शेजारच्या राज्यांतील होंडा मोबाइल सर्व्हिस व्हॅन्स व प्रशिक्षित तंत्रज्ञही उपलब्ध होतील. होंडा ग्राहकांना होंडा टू व्हीलर्स टोल फ्री कस्टमर केअर क्रमांक १८०० १०३ ३४३४ येथे वाहनाची नोंदणी करता येईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search