Next
‘व्हीव्हीपॅट’संदर्भात सहा लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
महाराष्ट्रात ९६ हजार मशीन वापरणार
प्रेस रिलीज
Wednesday, March 13, 2019 | 12:21 PM
15 0 0
Share this story

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी या वर्षी प्रथमच व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्रांचा वापर केला जाणार असून, महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांसाठी ९६ हजार यंत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील ९६ हजार मतदान केंद्रांवरील सहा लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सध्या सुरू असून, त्यांना तीन स्तरावर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

‘व्हीव्हीपॅट’ यंत्रणा ‘ईव्हीएम’ मशीनसाठी पुरक असून, मतदान केल्याची पावती या यंत्रांच्या माध्यमातून मतदारास मिळणार आहे. मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिले त्या संदर्भात माहिती ‘व्हीव्हीपॅट’वरील बटण दाबल्यानंतर मिळणार आहे. मतदान केंद्रांमध्ये हे ‘व्हीव्हीपॅट’ यंत्र बसविण्यात येणार आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदांमध्ये मतदाराला पावती मिळणार असून. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराला त्याने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य होईल.

या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वत्र प्रथमच या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून ‘व्हीव्हीपॅट’ मशीनच्या वापराबद्दल सूचना निवडणूक यंत्रणेला देण्यात आले आहेत. या संदर्भात विभागस्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले आहे. मतदान केंद्रांवर जाणाऱ्या सुमारे सहा लाख कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रासाठी सुमारे एक लाख ३५ हजार ‘व्हीव्हीपॅट’ यंत्र उपलब्ध करून देण्यात येतील. त्यापैकी प्रत्येक मतदान केंद्रावर एक याप्रमाणे ९६ हजार यंत्रांचा वापर या निवडणुकीत केला जाणार आहे. अतिरिक्त यंत्रे झोनल अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येतील,’ असे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link