Next
अॅड. प्रज्ञेश सोनावणे यांच्या वाढदिवसानिमित्त कविसंमेलन
मिलिंद जाधव
Saturday, October 06, 2018 | 11:18 AM
15 0 0
Share this article:

ठाणे : अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘काव्यचैतन्य’ या कविसंमेलनाचे आयोजन ठाणे येथे करण्यात आले होते. चैतन्य सुखदेव सोनावणे फाउंडेशन व सुप्पारक कला संस्था, ठाणे, लक्ष्य प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अॅड. प्रज्ञेश सोनावणे हे छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील युवा प्रतिनिधी, कवी, साहित्यिक, लेखक, वक्ते आणि माहिती अधिकार कायद्याचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. या कविसंमेलनात कवींनी विविध विषयांवर आपल्या दर्जेदार कविता सादर केल्या. 

ज्येष्ठ उर्दू शायर, गज़लकार साजन शिंदे, ज्येष्ठ कवी, गायक किरण सोनावणे, ज्येष्ठ मराठी गज़लकार नीला वाघमारे, कवी अशोक डोळस, हिंदुराव नांगरे (प्रीतम), धनंजय सरोदे, पूजा सोनावणे, आर्यन जानराव, आंबेडकरी चळवळीतील पँथर सि. रा. जाधव, सुखदेव कर्डक, ज्येष्ठ गायक, कवी नामदेव जगताप, कवी मंगेश सावंत, कवी श्रीकृष्ण ठोंबरे, अनिल शिंदे, अॅड बळीराम मोरे अॅड. कैलास केदारे, दादासाहेब यादव, प्रवीण केदारे, उद्योजक वैभव भोईर, राजेश चौहान, सामाजिक कार्यकर्ते नितीन मोरे, प्रणय घोरपडे, संदेश खांबे, रामचंद्र पवार, उबाळे गुरुजी, बापू मखरे, नितीन कांबळे, सागर कांबळे, योगेश जाधव, प्रीतिश सोनावणे, प्रतिभा सोनावणे आदी या वेळी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. प्रज्ञेश सोनावणे यांनी केले. सहभागी कवींना सन्मानपत्र देण्यात आले. ‘आपले सर्वांचे प्रेम असेच राहू द्या,’ असे सांगत अॅड. प्रज्ञेश सोनावणे यांनी सर्वांचे आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pradnyesh Sonawane About 229 Days ago
सुंदर बातमी दिलेली आहे. आपण असेच बातमी सदैव आपल्या लोकप्रिय बाईट्स ऑफ इंडिया देत राहा आमच्या कडून आपल्याला खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
0
0

Select Language
Share Link
 
Search