Next
नवक्रांती मित्र मंडळाला जिल्हास्तरीय पुरस्कार
BOI
Monday, January 28, 2019 | 03:54 PM
15 0 0
Share this article:



ठाणे : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत ठाणे येथील नेहरू युवा केंद्राच्या वतीने ग्रामीण भागात युवा विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ठाण्यातील शहापूर तालुक्यातील नवक्रांती मित्र मंडळाला जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रजासत्ताकदिनी आयोजित शासकीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम व आरोग्य मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार प्रदान केला.

एक एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या आर्थिक वर्षात केलेल्या युवा विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम रूपये २५ हजार, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तर निवड समितीने सन २०१७-१८साठीचा हा पुरस्कार दहिवलीतील नवक्रांती मित्र मंडळास जाहीर केला होता.

मंडळाने मागील वर्षात नेहरू युवा केंद्रातर्फे आरोग्य शिबिर, व्यवसाय प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा, विविध शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता, पर्यावरण, युवा आदान प्रदान कार्यक्रम, राष्ट्रीय एकता कार्यक्रम, महिला सबलीकरण, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिवस, सामाजिक कार्यक्रम आदी विविध क्षेत्रात कार्य केले आहे.

हा वेळी मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय एस. पाटील, माजी अध्यक्ष एकनाथ पाटील, सचिव महेश सातपुते, सदस्या सोनम पाटील, प्रतीक्षा पाटील उपस्थित होते. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक प्रल्हाद सोनुने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मंडळाचे कौतुक केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search