Next
नवा जिओफोन केवळ ५०१ रुपयांत
प्रेस रिलीज
Friday, July 20, 2018 | 04:10 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘जिओ’ने धमाकेदार मॉन्सून हंगामा ऑफर जाहीर केली असून, यामध्ये ग्राहकांना जुना फिचरफोन देऊन अवघ्या पाचशे एक रुपयांमध्ये नवा जिओफोन मिळणार आहे. २० जुलैला सायंकाळी पाच वाजल्यानंतर ही ऑफर सुरू होत आहे. भारताला ‘डेटा’शक्तीच्या जोरावर बदलण्याची मोहीम जिओने सुरू केली असून, मॉन्सून हंगामा ऑफरमुळे कोट्यवधी ग्राहक जिओ डिजिटलची सेवा घेतील,असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. 

देशात सुमारे ५० कोटीहून अधिक जण फीचरफोनचा वापर इंटरनेटविना करीत आहेत. त्यांना परवडण्याजोगी सेवा नसल्याने त्यांच्यासाठी डिजिटल लाईफची दारे बंद आहेत. जिओ आणि जिओफोन यामध्ये बदल घडवत आहेत. केवळ स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेले अॅप्स नव्या जिओफोनमध्ये असून, यामध्ये फेसबुक, व्हॉट्‌सअॅप आणि यूट्यूबचा समावेश आहे. जिओफोन ग्राहकांना १५ ऑगस्टपासून सर्व अॅप्स उपलब्ध होतील. 

अखंडित फोर जी  सेवा आणि व्हॉईस कमांड फीचरमुळे जिओफोनमध्ये फेसबुक, व्हॉट्‌सअॅप आणि यूट्यूब यांचा वापर अतिशय सहज आणि साध्यासोप्या पद्धतीने करता येईल. व्हॉईस कमांड फीचरचा वापर करुन ग्राहक कॉल करणे, संदेश पाठविणे, इंटरनेटवर सर्च करणे, संगीत ऐकणे, व्हिडिओ पाहणे, तसेच सर्व अॅप्लिकेशनचा वापर करु शकतील. जिओफोनमध्ये असलेल्या इतर अॅप्समुळे नवा व्यवसाय व संधी, शिक्षण, रोजगारनिर्मिती, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या सेवा एका क्लिकवर मिळतील. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search