Next
‘महिंद्रा फायनान्स’तर्फे निश्चित ठेवींच्या दरात वाढ
प्रेस रिलीज
Monday, September 03, 2018 | 01:52 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : महिंद्रा फायनान्स या भारतातील आघाडीच्या ग्रामीण वित्त कंपनीने आपल्या निश्चित ठेवींवरील व्याजदरांमध्ये सुधारणा केली असून, हे दर २३ ऑगस्ट २०१८पासून लागू करण्यात आले आहेत.

१२ महिन्यांपर्यंतच्या ठेवींसाठीचा व्याजदर ३० बीपीएसने वाढून आठ टक्क्यांपर्यंत नेण्यात आला आहे, तर १८ महिन्यांपर्यंतच्या ठेवींचा दर ३५ बीपीएसने वाढून ८.१० टक्क्यांवर आणि २४ महिन्यांपर्यतचा दर १० टक्क्यांनी वाढून ८.३५ टक्क्यांवर नेण्यात आला आहे. गुंतवणुकदारांनी वेगळ्या कालावधीच्या ऑनलाइन गुंतवणुकीचा पर्याय निवडल्यास त्यांना ०.२५ टक्के जास्त दर मिळणार आहे. महिंद्रा फायनान्सने या वर्षात दुसऱ्यांदा दोन महिन्यांत निश्चित ठेवींवरील दर वाढवले आहेत.

निश्चित ठेवींवरील दरात करण्यात आलेल्या वाढीबद्दल महिंद्रा फायनान्सचे कार्यकारी संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी व्ही. रवी म्हणाले, ‘आर्थिक बाबींशी संबंधित चिंतामुक्त भविष्य घडवण्यासाठी निश्चित ठेवी गुंतवणुकीचे सर्वाधिक पसंतीचे साधन बनत आहे. यापुढे व्याजदराची परिस्थिती अशाचप्रकारे ठाम राहाणार आहे, असे आम्हाला वाटते. महिंद्रा फायनान्सेसच्या निश्चित ठेवी सर्व प्रकारच्या ठेवीदारांसाठी साजेशा तयार करण्यात आल्या असून, त्यात कमी जोखमीसह खात्रीशीर परतावे दिले जातात.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search