Next
सुवर्णपदकविजेत्या राहीचा पुण्यात सत्कार
BOI
Thursday, September 20, 2018 | 06:14 PM
15 0 0
Share this article:

सुवर्णपदक विजेत्या राही सरनोबत हिच्या सत्कार समारंभाविषयी माहिती देताना शांतिदूत प्रॉडक्शन्सचे योगेश जाधव व अन्य मान्यवर

पुणे : ‘नुकताच अर्जुन पुरस्कार जाहीर झालेली आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू राही सरनोबत हिचा पुण्यात शनिवारी, २२ सप्टेंबर रोजी भव्य जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे हा सोहळा होणार असून, शांतिदूत प्रॉडक्शन्स आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे', अशी माहिती शांतिदूत प्रॉडक्शन्सचे योगेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी समर्थ शांतिदूत प्रतिष्ठानच्या संस्थापक विद्या जाधव उपस्थित होत्या. 

 ‘कोल्हापूरच्या राहीने यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत तिच्या आवडीच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात तिने ३४ गुण मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. या क्रीडा प्रकारात ती आघाडीची भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. दरम्यान, बुधवारी  तिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. तिची कामगिरी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. तिच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळावी,या उद्देशाने या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी हडपसर येथील आय.एम.ए संस्था, कोथरूड येथील युनिव्हर्सल आयकॉन अॅकॅडमी यांचे सहकार्य मिळाले आहे’, असे जाधव यांनी नमूद केले.

‘या कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून, विधानपरिषद सचिव यु. के. चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. विठ्ठल जाधव, पीएमआरडीचे सीईओ किरण गित्ते, चाणक्य मंडलचे संचालक अविनाश धर्माधिकारी, क्रीडापटू अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, अभिनेता अजिंक्य देव, माहिती जनसंपर्क उपसंचालक मोहन राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, लेखक, दिग्दर्शक समृद्धी जाधव उपस्थित राहणार आहेत. या वेळी ‘स्नेहवन’ या संस्थेतील मुलांचा विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला आहे’, असेही जाधव यांनी सांगितले.  

कार्यक्रमाविषयी 
राही सरनोबत सत्कार 
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर 
वेळ : शनिवार, २२ सप्टेंबर, सकाळी ११.३० वाजता
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search