Next
विनोद कांबळे, सुभाष चित्रे यांना नौशाद स्मृती पुरस्कार प्रदान
BOI
Saturday, April 13, 2019 | 01:41 PM
15 0 0
Share this article:

नौशादपुणे : ‘नौशाद यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातून गेल्या शतकात आपण स्वतंत्र असा ठसा उमटवून बहुभाषिक रसिकांना तरल, सुरेल शाश्वत आनंददायी मेजवानीच दिली. त्यांच्या जादूभरी संगीताने मदर इंडिया, मुगल-ए-आझम, दिल दिया दर्द लिया, दुलारी, बैजू बावरा, मेला, अंदाज, पाकीजा, मेरे मेहबुब, कोहिनूर आदी चित्रपट अजरामर झाले. नौशाद म्हणजे संगीत विश्वातील कोहिनूरच’, असे उद्गार ज्येष्ठ कलावंत आणि चित्रपट अभ्यासक डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी काढले. 

डॉ. मधुसूदन घाणेकर
नौशाद यांच्या जन्मशताब्दीपूर्तीचे औचित्य साधून ‘मधुरंग’ संस्थेतर्फे ‘गंधर्व आर्टस’चे कलावंत डॉ. विनोद कांबळे आणि संगीतोपासक सुभाष चित्रे यांना डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते ‘नौशाद स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी डॉ. घाणेकर बोलत होते. 

नौशाद यांनी संगीत दिलेली काही गाणीदेखील डॉ. घाणेकर यांनी या वेळी सादर केली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री मंदा नाईक होत्या. प्रकाश साठे यांनी संयोजन केले. 

या सोहळ्यात संजय मरळ, शलाका गाडगीळ, जितेंद्र बाराथे, दीपक शर्मा, डॉ. सुधीर कुलाल, रवींद्र गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते. मेघना घाणेकर यांनी आभार मानले. पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त ‘गंधर्व आर्ट्स’ तर्फे ‘ओल्ड इज गोल्ड’ हा जुन्या हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रमही सादर करण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Jitendra Barathe About 71 Days ago
डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी खूप योग्य व्यक्तींचा सत्कार केला, खूप छान
0
0
Prakash sathe About 71 Days ago
Mast program
0
0

Select Language
Share Link
 
Search