Next
‘आयटम’ला महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर पुरस्कारासाठी नामांकन
प्रेस रिलीज
Friday, March 16 | 04:33 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘द महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अॅवॉर्डस’  (मेटा) साठी   ‘आयटम’ या नाटकाला नामांकन मिळाले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या १३व्या राष्ट्रीय रंगभूमी महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्यासाठीची नामांकने नुकतीच येथे जाहीर करण्यात आली.

हा सोहळा १३ ते १८ एप्रिल दरम्यान नवी दिल्ली येथील कमानी सभागृह आणि श्रीराम सेंटर येथे होणार आहे. या वेळी वैविध्यपूर्ण विषयांवरील नामांकने मिळालेल्या दहा कलाकृती परीक्षक आणि श्रोत्यांसमोर सादर होतील. या वर्षीची अंतिम दहा नाटके आसामी, बंगाली, इंग्रजी, हिंदी, कन्नड, मल्याळी आणि मणिपुरी भाषेमध्ये सादर होणार आहेत. 

मेटा पुरस्कारांच्या माध्यमातून भारतातील रंगभूमीविषयी जागरुकरता आणि कृतज्ञता वाढावी हा उद्देश आहे. मेटा पुरस्कारां साठी यावर्षी देशभरातून सुमारे ३३० नाटके सहभागी झाली होती. त्यामध्ये देशातील २२ राज्यांमधून २८० नाट्य संस्थांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये २० अधिकृत भारतीय भाषा आणि १० प्रादेशिक बोली भाषांमधील नाटकांचा समावेश होता. 

भारती आचरेकर, चंद्रदासन, स्वरूपा घोष, विक्रम फुकन आणि विवेक मनसुखानी यांसारख्या दिग्गज नाट्यकर्मींच्या समितीनेही नाटके पाहिल्यानंतर गेल्या वर्षात सादर झालेल्या दहा नाटकांना पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर करण्यात आली.

‘मेटा २०१८’मध्ये जीवनगौरव पुरस्कारासह १४ विभागांमध्ये पुरस्कार देण्यात येतील. सर्वोत्तम नाटक, सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम नेपथ्य, सर्वोत्तम प्रकाश संयोजन, सर्वोत्तम ध्वनी संयोजन, सर्वोत्तम वेशभुषा, सर्वोत्तम अभिनेता, सर्वोत्तम अभिनेत्री, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्तम मूळकथा, सर्वोत्तम एकत्रिकरण आणि सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन या विभागांमध्ये पुरस्कार देण्यात येतील. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link