Next
स्त्रियांवरील अत्याचारांच्या निषेधासाठी दक्षिण आफ्रिकेत ‘साडी स्ट्रोल’
BOI
Wednesday, September 18, 2019 | 02:31 PM
15 0 0
Share this article:


जोहान्सबर्ग : भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या साडीचे आकर्षण जगभरातील महिलांना असते. भारतीय महिलांचा पारंपरिक पोशाख असलेली साडी स्त्रियांवरील अत्याचाराचा विरोध करणाऱ्या चळवळीचे साधन बनली असून, जागतिक पातळीवर एक नवीन ओळख तिला मिळाली आहे. डर्बन येथे तीन हजारांपेक्षाही अधिक महिलांनी साडी नेसून ‘साडी स्ट्रोल’ सोहळ्यात स्त्रियांवरील अत्याचारांना विरोध दर्शविला. स्त्रियांबाबतच्या हिंसेला वाचा फोडण्यासाठी सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा म्हणून ही अभिनव मोहीम राबवण्यात आली.


विशेष म्हणजे पुरुष स्वयंसेवकही या कार्यक्रमाला उपस्थित होते. महिलांवरील अत्याचारांचा निषेध करणारे फलक घेऊन त्यांनीही या मोहिमेला आपला पाठींबा दर्शवला.    


साड्यांच्या संग्राहक नटली लँग आणि डर्बनमधील आर्य समाजच्या कमलेश गौंडेन यांच्या संकल्पनेतून दहा वर्षांपूर्वी साडी स्ट्रोल हा अनोखा सोहळा सुरू झाला. सुरुवातीला  फक्त साडी नेसून मिरवणे, धमाल करणे इतकाच याचा हेतू होता; मात्र नंतर त्याला सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आणि त्यातून सामाजिक विषयही मांडले जाऊ लागले. सुरुवातीला फक्त ४०० ते ४५० महिला यात सहभागी झाल्या होत्या. आता वेगवेगळ्या समाजातील तीन हजारांपेक्षा जास्त स्त्री, पुरुष यात सहभागी होतात. 


डर्बनमध्ये भारतीय समाज मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिक झुलू स्त्रियांसह अन्य समाजातील स्त्रियांनाही साडीचे आकर्षण असल्याने साडी परिधान करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत आहे. वेगवेगळ्या समाजांना या माध्यमातून जोडले जात आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘साडी स्ट्रोल’चे व्यासपीठ महत्त्वाचे ठरले आहे.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search