Next
‘येस बॅंके’ला ‘म्युच्युअल फंड’साठी ‘सेबी’कडून मंजुरी
प्रेस रिलीज
Friday, July 06, 2018 | 03:05 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतामधील खासगी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची बॅंक असलेल्या येस बॅंकेने आपल्याला ‘सेबी’कडून (सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) म्युच्युअल फंडाचा व्यवसाय करण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाल्याची घोषणा केली. ‘रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया’ने (आरबीआय) येस बॅंकेला नुकतीच एका म्युच्युअल फंडाला ‘स्पॉन्सर’ करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर ‘सेबी’कडून‘येस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायात उतरण्याची मंजुरी मिळाली आहे.

याबद्दल येस बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर म्हणाले, ‘येस अॅसेट मॅनेजमेंट (इंडिया) लिमिटेड (वायएएमआयएल) आपला येस बॅंकेचा बॅंकिंग क्षेत्रातील सर्व अनुभव उपयोगाला आणेल. त्याद्वारे ही बॅंक भांडवली, रिटेल, कॉर्पोरेट तसेच वित्तीय गुंतवणूक संस्थांची विविध कर्जरूपी रकमेचा विनियोग भांडवली बाजार, तसेच कर्ज भांडवली बाजारात परिणामकारकरित्या करील. या उपक्रमाचा येस बॅंकेच्या रिटेल ‘लायबिलीटीज’ आणि संपत्ती व्यवस्थापनाला मदत होईल. त्याद्वारे ‘वायएएमआयएल’ बॅंकेचे ‘DIGICAL’ वितरण जाळे प्रस्थापित करेल. त्याचा उपयोग ग्राहकांना अखंड आणि उत्तम बॅंकिंग अनुभवासाठी होईल. येस बॅंकेच्या ध्येयधोरणांनुसार ‘वायएएमआयएल’ भक्कम पायाभूत तंत्रज्ञानाचा पाया उभारून ग्राहकांना आपल्या गुंतवणुकदारांसाठी सर्वोत्तम सेवा तसेच उत्कृष्ट मानवी भांडवल उपलब्ध करील.’

‘वायएएमआयएल’चे कामकाज येस बॅंकेच्या लोअर परळ येथील मुख्यालय इमारतीच्या बाहेर चालेल. ‘वायएएमआयएल’ तसेच भक्कम तंत्रज्ञान, वास्तूविशारद, फंड लेखापरीक्षणासाठी भागीदारी, कस्टोडियन सेवा, नोंदणी-बदली एजंट सेवेच्या कामकाजासाठी सेटअप उभारण्यात आला आहे. हे कामकाज पाहण्यासाठी कंपनीचे संचालक तसेच विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत परिपक्व अशा व्यवस्थापकीय टीमची निवड करण्यात आली आहे. ही सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये सध्या पारंगत आहेत.

येस बॅंकेने अंगिकारलेल्या ‘नॉलेज बॅंकिंग’ पद्धतीमुळे बॅंकेला अर्थव्यवस्थेमधील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अनुभवी आणि तज्ज्ञांचे वित्तीय मार्गदर्शन मिळत आहे. या वेगळ्या पद्धतीच्या अनुभवामुळे ‘वायएएमआयएल’ला कर्ज आणि भांडवली बाजारात पुढील सहा महिन्यांमध्ये फंडाचे सादरीकरण करता येणार आहे.

येस बॅंकेच्या अलायन्सेस अॅंड रिलेशनशीप्स ड्रीव्हन बाय टेक्नॉलॉजीमुळे (एआरटी) ‘वायएएमआयएल’द्वारे वाढणाऱ्या गुंतवणुकदारांच्या संख्येकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे; तसेच कल्पक वित्तीय मार्ग शोधून ग्राहकांच्या बॅंकिंग अनुभवात क्रांतिकारी बदल घडविले जातील. ‘वायएएमआयएल’तर्फे ‘डिजीटल फर्स्ट’ वितरण जाळे उभारले जाणार आहे. म्युच्युअल फंड क्षेत्रामधील वाढती संधी साधण्यासाठी भक्कम प्रक्रिया आणि सर्वोत्तम मानवी भांडवलाद्वारे हे जाळे उभारले जाईल.

‘सेबी’ची ही मंजुरी म्हणजे येस बॅंकेच्या भारतीय वित्तीय बाजारपेठेमधील अस्तित्वासंदर्भात एक महत्त्वाचा माइलस्टोन आहे; तसेच बॅंकेला ‘सेबी’कडून नुकतेच ‘कस्टोडियन ऑफ सिक्युरिटीज’ व्यवसाय करण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाली. याखेरीज रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या परवानगीनुसार येस बॅंक आपल्या युएइ आणि अबूधाबी येथील कार्यालयांव्यतिरिक्त लंडन आणि सिंगापूर येथे आपले कार्यालये सुरू करणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link