Next
मार्च २०१९पर्यंत होणार दीड कोटी पासपोर्ट्सची छपाई
इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये कामाला युद्धपातळीवर सुरुवात
BOI
Thursday, November 29, 2018 | 12:36 PM
15 0 0
Share this article:

नाशिक : देशाला चलन पुरवठा करणाऱ्या इंडिया सिक्युरिटी प्रेस या केंद्र सरकारच्या प्रेसमध्ये सध्या एक कोटी साठ लाख पासपोर्ट्सच्या छपाईचे काम सुरू असून, मागील वर्षीपेक्षा या वर्षी पासपोर्ट्स छपाईचे काम मोठ्या प्रमाणावर आले आहे. हे काम मार्च २०१९पर्यंत युद्धपातळीवर चालणार असल्याची माहिती प्रेसमधून देण्यात आली. या छपाईमुळे भारताला चलन पुरवठा करणाऱ्या प्रेसच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार व मागणीनुसार पासपोर्टची ऑर्डर वाढू शकते. हा आकडा वाढल्यास पासपोर्ट छपाईच्या माध्यमातून प्रेसला मोठा आर्थिक महसूल प्राप्त होणार आहे. मार्च २०१६ ते मार्च २०१७ या वर्षात एक कोटी २७ लाख पासपोर्ट्स कामगारांनी छापून दिले होते. मार्च २०१८ मध्ये एक कोटी साठ लाख पासपोर्ट्सचे काम आले असून, कामगारांना रजा किंवा रविवारी सुट्टी न घेता हे काम करावे लागणार आहे. यामुळे नाशिकच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून, प्रेसला होणारा आर्थिक नफा या वर्षी वाढणार आहे.

करन्सी नोट प्रेस (सीएनपी) आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस (आरएसपी) या दोन प्रेसमध्ये मिळून सध्या साडेचार हजार कामगार आहेत. केंद्रातून मिळणाऱ्या आदेशाचे पालन प्रेसमधील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनाही करावे लागते म्हणून या वर्षी पासपोर्ट छपाईची संख्या वाढणार असून, कामगारांनी मेहनतीने हे आव्हान पेलले असल्याचे सांगण्यात येत आहे

दिनकर खर्जुलयाबाबत प्रतिक्रिया देताना मजदूर संघाचे उपाध्यक्ष दिनकर खर्जुल म्हणाले, ‘वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रेसमध्ये विविध कामे चालत असून, यामध्ये कामगारांनी प्रचंड काम केल्यामुळे नोटबंदीच्या काळात प्रेसमधून संपूर्ण भारताला नोटांचा पुरवठा होऊ शकला. त्याच धर्तीवर आता आलेली सर्व आव्हाने आम्ही पूर्ण करणार असून, या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.’

कार्तिक डांगेमजदूर संघाचे जॉइंट सेक्रेटरी कार्तिक डांगे म्हणाले, ‘कामगार सध्या रविवारीही कामावर येत असून, सुट्टीचा दिवस अडचणीच्या काळात भरून काढण्याची आदर्श योजना आम्हाला दिल्यामुळे आम्हाला कामाचा ताणही जाणवत नाही. विविध पातळ्यांवरील काम आम्ही प्रयत्नपूर्वक ठरवून दिलेल्या मुदतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करणार असून, कामगारांच्या एकीमुळे ही आव्हाने आम्ही पेलत आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search