Next
ढेपे वाड्याला बौद्धिक स्वामित्व हक्क
असा हक्क मिळणारी पहिली वास्तू बनण्याचा मान
BOI
Thursday, January 10, 2019 | 12:51 PM
15 0 0
Share this story


पुणे : येथील ढेपे वाडा ही वास्तू बौद्धिक स्वामित्व हक्क मिळवणारी देशातील पहिली पारंपरिक वास्तू ठरली आहे. ‘भारतीय पारंपरिक खेळ, खाद्यपदार्थ, पेहराव, तसेच विविध कला व संस्कृती जोपासण्याचे काम करणाऱ्या ढेपे वाडा या संकल्पनेला भारत सरकारकडून बौद्धिक स्वामित्व हक्क प्रदान करण्यात आला आहे,’ अशी माहिती ढेपे वाड्याचे संस्थापक नितीन ढेपे आणि ऋचा ढेपे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी राजस ढेपे, विश्वास देशपांडे, श्रद्धा देशपांडे उपस्थित होते.

 पत्रकार परिषदेत माहिती देताना श्रद्धा देशपांडे, ऋचा ढेपे, नितीन ढेपे व विश्वास देशपांडे.

‘महाराष्ट्रातील वाडा संस्कृती व समृद्ध मराठी वास्तुशैली पुनरुज्जीवित करणारी नव्याने बांधलेली वास्तू अशी ओळख निर्माण करणारी आणि तसे बौद्धिक स्वामित्व हक्क मिळवणारी ढेपे वाडा भारतातील पहिली पारंपरिक वास्तू ठरली आहे. 

‘वाडा’ या पारंपरिक भारतीय वास्तुरचनेमधील राहणीमान व त्यात नांदणारी संस्कृती नव्या पिढीला आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांना पर्यटनातून अनुभवता यावी या जाणिवेतून ही वास्तू बांधण्यात आली आहे,’ असे नितीन ढेपे यांनी या वेळी सांगितले. 

‘भारतातील प्रत्येक राज्यातील पारंपरिक वास्तुरचना तिथल्या नैसर्गिक व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून उभारल्या गेल्या आहेत. त्यांची प्रदेशानुसार नावे वेगळी असली, तरी त्यातील रचनांमध्ये, राहणीमानामध्ये खूप साम्य आढळते. आंध्र प्रदेशातील वास्तुरचनांना ‘चुट्टीलू’ किंवा ‘मांडूवा लोगीस’ म्हणतात. तमिळनाडूत ‘चेट्टीनाडू हाउस’ म्हणतात. केरळात ‘नलूकेट्टू’ किंवा ‘थरवाड’ म्हणतात. कर्नाटकात ‘गुठ्ठू हाऊस’ किंवा ‘गुठ्ठू मेन्स’ म्हणतात. हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरातमध्ये ‘हवेली’ म्हणतात. पं. बंगालमध्ये ‘राजबारी’ म्हणतात, तर महाराष्ट्रात त्याला ‘वाडा’ म्हणतात. या पारंपरिक वास्तूंच्या बांधकामाची पद्धतच अशी होती की, प्रत्येक वास्तू किमान १०० ते १५० वर्षे सहज टिकत असे. त्यामुळे या वास्तूंमध्ये किमान सात ते आठ पिढ्या एकत्रपणे नांदत. कालानुरूप जुन्या पारंपरिक वास्तू झपाट्याने नामशेष होऊन तिथे मोठ्या इमारती उभ्या राहिल्या. काही वास्तूंचे रूपांतर हॉटेल्स व रिसॉर्टमध्ये झाले; मात्र नव्याने बांधलेला ढेपे वाडा पर्यटनाच्या माध्यमातून भारतीय लोकांनी समृद्ध भारतीय संस्कृतीतील वास्तुरचना आणि त्यातील राहणीमानाकडे पुन्हा वळावे यासाठी कार्य करत आहे,’ असेही ढेपे यांनी नमूद केले. 


‘ढेपे वाड्याच्या वेबसाइटला गेल्या चार वर्षांत जगभरातून जवळपास ७५ लाख नेटीझन्सनी भेट दिली असून, देश विदेशातील हजारो अतिथींनी भेट दिली आहे. ढेपे वाडा ही वास्तू सर्वार्थाने लोकांच्या पसंतीस उतरली असून, इथे पारंपरिक पद्धतीने साखरपुडा, लग्न, मुंज, वाढदिवस इत्यादी सोहळे साजरे केले जातात,’ असे ऋचा ढेपे म्हणाल्या.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link