Next
‘खेलो इंडिया युथ गेम्स’चे पुण्यात शानदार उद्घाटन
हजार खेळाडूंना दर वर्षी पाच लाख रुपये देण्याची क्रीडामंत्र्यांची घोषणा
BOI
Thursday, January 10, 2019 | 04:51 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘भारतात अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांनी अडचणींचा सामना करीत भारताचा झेंडा फडकविला आहे. त्यामुळे आता देशातील एक हजार खेळाडू निवडून त्यांना प्रत्येक वर्षी पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत.पुढील आठ वर्षे ही रक्कम देण्यात येणार आहे,’ अशी घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी बुधवारी, नऊ जानेवारी रोजी पुण्यात केली. 

खेलो इंडिया युथ गेम्सच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, गिरीश बापट, अनिल शिरोळे आदी मान्यवर.

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्सचे उद्घाटन पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलातील बॅडमिंटन सभागृहात झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सरसंचालिका नीलम कपूर, खेलो इंडियाचे सीईओ संदीप प्रधान, चेअरमन राजेंद्र सिंग, नाडाचे सरसंचालक नवीन अगरवाल, राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व क्रीडा क्षेत्रातील दिग्गज खेळाडू, क्रीडा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. 

राठोड पुढे म्हणाले,  ‘खेळाडूंना मेहनत करावी लागेल, हार-जीत पचवावी लागेल, हेच एका खेळाडूचे आयुष्य आहे. शिक्षण हे शाळेच्या वर्गापुरते मर्यादित नसते. खेळाच्या मैदानात जे शिक्षण मिळते ते कोणत्याही पुस्तकात मिळत नाही. आपण मजबूत बनलात तर देश मजबूत होईल. आपण खेळाल, तर संपूर्ण देश खेळेल.’ 

या वेळी औरंगाबाद येथे पाहिले क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले,  ‘आपण खेळा आणि स्वस्थ भारत निर्माण करा. स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या संदेशाला भारत सरकार आज खऱ्या अर्थाने कार्यान्वित करीत आहे. यासाठी खेलो इंडिया युथ गेम्स हे उत्तम व्यासपीठ आहे. खेलो इंडिया स्पर्धा या वर्षी महाराष्ट्रात झाली असल्याने, आम्ही महाराष्ट्रात पहिले क्रीडा विद्यापीठ उभारणार आहोत. खेळांचे स्टेडियम उभारण्यासाठी  तालुकास्तरावर एक कोटी रुपये दिले जात होते. आता त्यासाठी पाच कोटी रुपये देण्यात येतील. जिल्हा स्तरावर आठ कोटींऐवजी १६ कोटी रुपये आणि विभाग पातळीवर २४ कोटींऐवजी ४५ कोटी रुपये देण्यात येतील.’

 
उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिववंदना सादर करण्यात आली. या वेळी जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने स्टेडियम दुमदुमून गेले होते. 

महोत्सवासाठी विविध राज्यांमधील खेळाडूंचे आगमन झाल्यामुळे क्रीडानगरीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या क्रीडा महोत्सवात ३६ राज्यांमधील सहा हजार खेळाडू,  एक हजार ८०० तांत्रिक अधिकारी, एक हजारहून अधिक संघटक आणि ७५० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search