Next
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुन्हा यशस्वी
प्रेस रिलीज
Wednesday, May 30 | 03:31 PM
15 0 0
Share this story

मुंबई : राज्यात २४ जिल्ह्यांमध्ये झालेल्या विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक सरपंचपदे जिंकून भारतीय जनता पक्षाने पुन्हा पहिला नंबर मिळवला आहे. या यशाबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले व मतदारांचे आभार मानले.

राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये ६५७ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्याचे निकाल सोमवारी जाहीर झाले. त्यामध्ये सर्वाधिक १६९ सरपंचपदे भाजप उमेदवारांनी जिंकली. पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात ३४, तर कोल्हापूर जिल्ह्यात १७ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच विजयी झाले. उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात २६, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी नऊ ग्रामपंचायतींमध्ये भाजपला यश मिळाले.

अशा प्रकारे राज्याच्या सर्व विभागांमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतींमध्ये पक्षाची सत्ता प्रस्थापित केली आहे. राज्यात गेल्या तीन वर्षांमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आहे. सोमवारी (२८) जाहीर झालेल्या निकालांमध्येही भाजप आघाडीवर राहिला आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार यांची कामगिरी जनतेला पसंत पडली आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने देशभर ठिकठिकाणी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवले आहे. राज्यातही त्याच पद्धतीने भाजपला यश मिळाले आहे,’ असे प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link