Next
बीएमडब्ल्यूच्या चेन्नई प्रकल्पाचा अकरावा वर्धापनदिन
प्रेस रिलीज
Friday, March 30, 2018 | 06:10 PM
15 0 0
Share this story


चेन्नई :  बीएमडब्ल्यू इंडियाच्या  चेन्नई प्रकल्पाचा अकरावा वर्धापनदिन ख्यातनाम क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत  साजरा करण्यात आला. बीएमडब्ल्यू समुहाचे  इंडियाचे प्रेसिडेंट विक्रम पावाह , अन्ना युनिव्हर्सिटीचे डीन डॉ. गीता उपस्थित होते.

या वेळी अन्ना युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ‘स्किल नेक्स्ट’ या तांत्रिक कौशल्य उपक्रमाचा प्रारंभ केला. या उपक्रमाची सुरूवात त्यांनी या प्रकल्पातील  असेंब्ली लाइन येथे  इंजिन आणि ट्रान्समिशनची  जोडणी करून  केली.

देशात ऑटोमोटिव्ह प्रतिभेचा विकास करण्यात मध्यस्थाची भूमिका बजावणे हे ‘स्किल नेक्स्ट’चे मुख्य उद्दिष्ट आहे. हा उपक्रम भारतातील प्रत्येक राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून इंजिनीअरिंग आणि टेक्निकल इन्स्टिट्यूट्सना ३६५ बीएमडब्ल्यू इंजिन आणि ट्रान्समिशन युनिट्स मोफत पुरवले जाणार आहेत. यामुळे इंजिनीअरिंग आणि टेक्निकलच्या विद्यार्थ्यांना बीएमडब्ल्यू इंजिन आणि ट्रान्समिशनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.  बीएमडब्ल्यू इंडियातर्फे इंजिनीअरिंग कॉलेज,  इंडस्ट्रीअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटस, पॉलिटेक्निक्स यांना २०१८ च्या अखेरीपर्यंत इंजिन आणि ट्रान्समिशन युनिट्स  देण्यात येणार आहेत.

शैक्षणिक संस्थांनी सुयोग्य हमी दिल्यानंतर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर या युनिट्सचे वितरण केले जाईल. इंजिन आणि ट्रान्समिशन युनिट्स इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये लॅबोरेटरीजमध्ये फक्त शैक्षणिक हेतूनचे वापरले जातील, याची खातरजमा करण्यासाठी संस्थांनी हमीपत्र द्यायचे आहे.

 बीएमडब्ल्यू समुहाचे  इंडियाचे प्रेसिडेंट विक्रम पावाह म्हणाले, ‘भारतातील लक्झ्युरी गाड्यांच्या विभागात गेल्या दशकभरात प्रचंड वाढ झाली आहे आणि रस्त्यांवर गाड्यांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे, या क्षेत्रात चांगल्या तंत्रज्ञांनाही मोठी मागणी निर्माण झाली आहे. स्किल नेक्स्टच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान देऊन त्यांच्यातील तांत्रिक क्षमता विकसित केल्या जातील. या उपक्रमामुळे भारतातील ऑटोमोटिव्ह डीलरशीपमध्ये सध्या असलेल्या प्रशिक्षित तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यातही हातभार लागणार आहे. ’

या वेळी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अन्ना युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आणि सचिन तेंडुलकर यांनी येथे बीएमडब्ल्यू एक्स३साठी एट-स्पीड स्टेपट्रॅानिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह बीएमडब्ल्यू टि्वन पॉवर टर्बो इन-लाइन चार सिलेंडर डिझेल इंजिनची जोडणीही केली.

सचिन तेंडुलकर म्हणाले,  ‘स्किल नेक्स्ट’ सारखे उपक्रम आपल्या देशात ऑटोमोटिव्ह कौशल्यांच्या विकासाला चालना देतील, असे मला ठामपणे वाटते. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यार्थ्यांना यामुळे थेट इंजिन आणि ट्रान्समिशनवर प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. फक्त क्रिकेटबद्दल वाचून मी कधीच खेळू शकलो नसतो. मला प्रत्यक्ष तो खेळ खेळावा लागला. त्याचप्रमाणे ‘स्किल नेक्स्ट’मुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान समजून घेणे शक्य होणार आहे.’

या वेळी अन्ना युनिव्हर्सिटीचे डीन डॉ. गीता म्हणाले, ‘इंजिनीअरिंगमध्ये निर्मिती आणि नाविन्यतेसाठी संकल्पना स्पष्ट असणे अत्यावश्यक आहे. हल्लीच्या वेगाने बदलणाऱ्या जगात तंत्रज्ञानही सातत्याने विकसित होत आहे, त्यामुळे अनुभवातून शिक्षण घेणे महत्त्वाचे ठरते. आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल पुस्तकांमध्ये वाचणे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. ‘स्किल नेक्स्ट’ सह विद्यार्थ्यांना बीएमडब्ल्यु इंजिन आणि ट्रान्समिशन युनिट्सचे निरिक्षण करणे, सराव, त्याबद्दलचे ज्ञान मिळवणे आणि प्रत्यक्ष वापरात त्याचा परिणामकारक उपयोग कसा करायचा हे शिकणे शक्य होणार आहे. ’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link