Next
नवनिर्माण कलागौरव पुरस्काराचे वितरण आठ जूनला
प्रेस रिलीज
Friday, June 07, 2019 | 01:32 PM
15 0 0
Share this article:

अमेय खोपकरपुणे : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेतर्फे ‘नवनिर्माण कलागौरव’ पुरस्कार वितरण सोहळा आठ जून २०१९ रोजी प्रभात रस्त्यावरील कोहिनूर मंगल कार्यालयात दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपटसेनेचे जिल्हाध्यक्ष चेतन धोत्रे व शहराध्यक्ष आनंद कुंदूर यांनी दिली.


गतवर्षात चित्रपट, नाटक व मालिकांमध्ये आपला दमदार अभिनय सादर करणाऱ्या क्षितीश दाते, अक्षय परांजपे, राहुल बेलापूरकर, प्रणव जोशी, किरण गायकवाड, राहुल मगदूम, मयुरी वाघ, शुभांगी दामले, हर्षद राजपाठक, प्रदीप वैद्य यांना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. 

या वेळी उपाध्यक्ष रमेश परदेशी, नेते अनिल शिदोरे, राजेंद्र (बाबू) वागस्कर, सरचिटणीस किशोर शिंदे, मनोज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या वेळी पीव्हीआर आंदोलनकर्ते यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांंसाठी ‘वृक्ष संवर्धन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरणाविषयी :
दिवस : शनिवार, आठ जून २०१९
वेळ : दुपारी १२.३० वाजता 
स्थळ : कोहिनूर मंगल कार्यालय, प्रभात रोड, पुणे 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search