Next
‘एलएनटी ’च्या हजाराव्या मीटिंग सेंटरचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Thursday, June 21, 2018 | 02:41 PM
15 0 0
Share this story

मुंबई : सूक्ष्म कर्जाच्या व्यवसायासाठी एलएनटी फायनान्सने (एलटीएफ) पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एक हजारावे मीटिंग सेंटर सुरू केले आहे. ‘एलटीएफ’ ही भारतातील आघाडीची नॉन-बँकिंग वित्तीय सेवा कंपनी (एनबीएफसी) असलेल्या एलएनटी फायनान्स होल्डिंगची (एलटीएफएच) उपकंपनी आहे. ‘एलटीएफ’ने गेल्या दोन महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये १४ नवी मीटिंग सेंटर्स सुरू केली आहेत.

याशिवाय, कंपनीने एक अॅपचे अनावरण केले असून, याद्वारे ग्राहकांना सहजपणे तात्काळ कर्ज मंजूर करून देण्यात येणार आहे. कर्ज मंजुरी, गट स्थापना, ई-स्वाक्षरी, पावती देणे, रिस्क ऑडिट यासारख्या विविध प्रकारच्या सेवा ग्राहकांना सुलभरित्या देण्यासाठी सूक्ष्म कर्ज व्यवसाय डिजिटल करण्यात आला आहे.

३१ मार्च २०१८ला संपलेल्या वित्तीय वर्षात ‘एलटीएफ’कडे ७.५४९ कोटी रुपयांच्या सूक्ष्म कर्जांची मागणी झाली. त्यात ५७ हजार ५०० गावांतील सुमारे ३८.२ लाख महिलांचा समावेश आहे. देशाच्या इतर भागातही जलदगतीने सूक्ष्म कर्ज व्यवसायाचा विस्तार करण्यास एलटीएफने सुरुवात केली असून, २०१८ या आर्थिक वर्षात ‘एलटीएफ’ने तीन राज्यांत कामकाजास सुरुवात केली आहे. २०१८ या अर्थिक वर्षात ‘एलटीएफ’ने एकूण सात हजार २१४ कोटी रुपयांच्या कर्जांचे वाटप केले असून, यापैकी सुमारे ३० टक्के व्यवसाय हा या कालावधीत सुरु केलेल्या नव्या मिटिंग सेंटरच्या माध्यमातून मिळाला आहे. उत्पन्न मिळवून देणाऱ्या साधनाची उभारणी करण्यासाठी महिला उद्योजकांना ‘एलटीएफ’ पाठबळ देते. कंपनी दर महिन्याला साधारणपणे तीन लाख ग्राहकांना अशी संधी उपलब्ध करून देते.

मीटिंग सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामीण वित्तपुरवठा आणि मुख्य मनुष्यबळ अधिकारी सुनील प्रभुणे म्हणाले की, ‘हजाराव्या मीटिंग केंद्राचे उद्घाटन म्हणजे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. बँकेपासून अद्याप दूर असलेल्या ग्राहकांपर्यंत पोहचण्याचे आमचे धोरण असून, त्याचदृष्टीने आम्ही नव्या-नव्या भागात सातत्याने स्वत:चे अस्तित्त्व निर्माण करीत आहोत. ग्राहकांना सुखद अनुभव देण्याबरोबरच डिजिटल सेवा आणखी सक्षम करण्याची भूमिका हे नवे अॅप सुरू करण्यामागे आहे. ग्रामीण भागातील लोकांना शाश्वत असे उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सतत नवीन-नवीन उपाययोजना पुरवितो.’

तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, आसाम, बिहार, छत्तीसगढ, त्रिपुरा आणि झारखंड या १४ राज्यांमध्ये ‘एलटीएफ’ची मिटिंग सेंटर्स आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विश्लेषणावर आधारित व्यवसायनिर्मिती आणि मजबूत असे रिस्क गव्हर्नन्स फ्रेमवर्क याच्या जोरावर कंपनी भारतातील आघाडीची सूक्ष्म कर्ज पुरवणारी कंपनी बनली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link