Next
‘मोबाइलच्या अतिवापराने विविध आजारांना निमंत्रण’
मिलींद बेंबळकर यांचे मत
BOI
Wednesday, May 22, 2019 | 05:45 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘मोबाइलच्या अतिवापरामुळे, तसेच परिसरातील मोबाइल टॉवरमुळे विविध आजारांचे प्रमाण मोठया प्रमाणावर असल्याचे उघड झाले आहे. अनेक संस्था व डॉक्टरांच्या संशोधनानुसार मोबाइल टॉवरच्या रेडिएशनमुळे कर्करोग, स्तनाचा कर्करोग, हृदयविकार आदी आजार उद्भवतात. मोबाइलच्या अतिवापरामुळे डीएनए तुटून फ्री रॅडिकल तयार होतात. इतर देशाच्या तुलनेत आपल्या देशातील मोबाइल वापराचे प्रमाण जास्त आहे आणि आजकालच्या टेलिकॉम कंपन्यांच्या विविध डेटा ऑफर्स आणि फ्री कॉलिंगमुळे अलीकडे हे प्रमाण अधिकच वाढले आहे. त्याचा परिणाम सर्व वयोगटातील व्यक्तींवर झाल्याचे स्पष्ट झाले आहे,’ असे मत रेडिएशन तज्ञ मिलिंद बेंबळकर यांनी व्यक्त केले.

मिलींद बेंबळकर यांचा सत्कार करताना विनय र. र.

मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने शिवाजीनगर येथील दि इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्सच्या फिरोदिया सभागृहात आयोजित ‘मोबाइल वापराचे परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी मायक्रोवेव्ह रेडिएशनचे अभ्यासक सुरेश कर्वे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., राजेंद्र सराफ, संजय मालती कमलाकर आदी उपस्थित होते. 

‘कर्करोग, नपुंसकता, डोकेदुखी, थकवा, बधिरपण येणे इत्यादी आजारांमुळे २० टक्के तरुण पिढी ग्रासली आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगातून रेडिएशनचे दुष्परिणाम सिद्ध झाले आहेत. मोबाइलचा मानवाच्या आरोग्यावर परिणाम होतो, हे सिद्ध झाले नसल्याचे टेलिकॉम कंपन्या सांगतात. त्यामुळे मोबाईलचा वापर तारतम्यतेने करावा,’ असेही बेंबळकर यांनी सांगितले. 

सुरेश कर्वे म्हणाले, ‘मानवीवस्तीत असलेल्या टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे आणि मोबाईलच्या अतिवापराने येत्या दहा वर्षात कर्करोगाची त्सुनामी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाइलचा वापर बेताने करणे गरजेचे आहे. मोबाइल तसेच इतर उपकरणे ‘शॉर्ट टर्म युज’साठी आहेत. सहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाइल वापरल्याने उष्णता वाढते. त्यामुळे त्याचा जास्त वापर टाळावा. मोबाईलवर बोलताना तो कानापासून दहा मिलीमीटर अंतरावर राहील याची काळजी घ्यावी. कानात घातले जाणारे हेडफोन्स, ब्लू टूथ उपकरण म्हणजे कानात बसविलेला छोटा टॉवर, त्यामुळे आपण स्वःत आजरांना निमंत्रण देत आहोत. पालकांनी लहान मुलांना मोबाइल देणे सहसा टाळावे किंवा मोबाइल एरोप्लेन मोडवर ठेवून द्व्यावा. त्यामुळे रेडिएशनचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. लहान मुलांबरोबरच गरोदर महिलांनीदेखील मोबाइल वापर टाळावा.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search