Next
ठाण्यात सृजन लेखन-वार्तांकन कार्यशाळेचे आयोजन
मिलिंद जाधव
Monday, December 03, 2018 | 02:40 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : शहरातील पर्यावरण दक्षता मंडळाच्या ‘आपले पर्यावरण’ मासिकातर्फे पर्यावरण क्षेत्रातील विषयांवर सृजनशील लेखन आणि वार्तांकन व्हावे यासाठी सृजन लेखन-वार्तांकन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा १५ व १६ डिसेंबर २०१८ रोजी उत्तन येथील रामभाऊ माळगी प्रबोधिनीत होणार आहे. 

कार्यशाळेचे उद्घाटन लेखिका वीणा गवाणकर यांच्या होणार असून, या प्रसंगी त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी निसर्ग लेखक अनिल अवचट यांची उपस्थिती लाभणार असून, या वेळी ते मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे साहित्यिक अभिजित घोरपडे, पत्रकार आरती कुलकर्णी, लेखक संतोष शिंत्रे, पर्यावरणीय कायद्याचे अभ्यासक डॉ. अजय देशपांडे, पर्यावरणीय समस्यांचे वार्तांकन करणारे बद्री चॅटर्जी, ग्रीन स्टडीजवर प्रकाश टाकणारे प्रा. प्रशांत धर्माधिकारी हेही उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

अधिक माहिती देताना पर्यावरण दक्षता मंडळाच्या सदस्या  सुरभी वालावलकर म्हणाल्या, ‘पर्यावरणाची निगा राखणे हे प्रत्येकाचे काम आहे आणि सामाजिक जबाबदारीही आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाची हानी होत आहे. म्हणूनच पर्यावरणावर अधिकाधिक चांगले लिहिले जावे, पर्यावरण शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या हेतूने ही कार्यशाळा आयोजित केली आहे.’

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे कविता वालावलकर यांनी सांगितले.  

कार्यशाळेविषयी :
दिवस :
१५ व १६ डिसेंबर २०१८
स्थळ : रामभाऊ माळगी प्रबोधिनी उत्तन, भाईंदर, जि. ठाणे
नावनोंदणीसाठी संपर्क : ८४४६१ ४०१८९, ८८७९० ७४५०६
ई-मेल : apalaparyavaran@gmail.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search