Next
‘नामाचा गजर’मधून अनुभवता येणार भक्तिरसाची वारी
प्रेस रिलीज
Tuesday, July 03 | 06:27 PM
15 0 0
Share this story

पुणे : वारीच्या काळात संतांची मांदियाळी पुणेकरांना अनुभवता यावी या उद्देशाने कलाश्री संगीत मंडळ व एबीआयएल यांच्या वतीने ‘नामाचा गजर’ या  संतरचना आणि अभंग यांवर आधारित कार्यक्रमाचे गुरुवारी, ५ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध पार्श्वगायिका देवकी पंडित, किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक, पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी व नातू विराज जोशी आपली कला यानिमित्ताने रसिक श्रोत्यांसमोर सादर करणार आहेत.

कोथरूड येथील मयूर कॉलनीमधील एम. ई. एस. बालशिक्षण मंदिर प्रशालेच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून  प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर रसिकांना सभागृहात प्रवेश देण्यात येणार आहे. 

 याबरोबरच कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने कै. ह. भ. प. विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा ‘वैष्णव पुरस्कार’ आपल्या शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल देवकी पंडित यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. अकरा हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link