Next
‘दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासन देणार’
शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची माहिती
प्रेस रिलीज
Monday, June 24, 2019 | 04:45 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘राज्यात ज्या भागात दुष्काळ घोषित केला आहे तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करीत असून, यापुढे प्रात्यक्षिक परीक्षांच्या शुल्काची प्रतिपूर्तीही शासन करणार आहे. पुढील १५ दिवसांत ही प्रतिपूर्ती केली जाणार आहे,’ अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आज (२४ जून) दिली.

विधानसभेत राज्यातील दुष्काळी भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफ करण्याबाबत भीमराव धोंडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शेलार बोलत होते.

ते म्हणाले, ‘शुल्क प्रतिपूर्तीसाठी सोलापूर जिल्ह्यातील पात्र असलेल्या ९७२ माध्यमिक शाळांपैकी ५१८ शाळांचे प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील ७७ व मंगळवेढा तालुक्यातील ३४ शाळांचा समावेश आहे. दहावीच्या २४ हजार १३८, तर बारावीच्या १२ हजार ६१० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त असून, शालेय शिक्षण ८.५० कोटींची तर, समाजकल्याण विभाग ४८ लाखांची प्रतीपूर्ती पुढील १५ दिवसांत करून विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्यात येईल. दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेल्या तालुके व महसुली मंडळातील ज्या शाळांचे प्रस्ताव आले नाहीत अशा शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत.’

‘या पारंपारिक पद्धतीने शुल्क विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब होत असल्याने, भविष्यात ऑनलाइन पद्धतीने कार्यपद्धती राबविण्यात येईल जेणेकरून विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यात शैक्षणिक शुल्क जमा करण्यात येईल,’ असेही शेलार यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search