Next
‘व्हॅस्कॉन’च्या ‘गुडलाईफ’ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
प्रेस रिलीज
Tuesday, June 05, 2018 | 05:44 PM
15 0 0
Share this article:

 पुणे : ‘व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि.चा ‘गुडलाईफ’ हा नवीन प्रकल्प दाखल केल्यापासून, एका आठवड्यातच तेथील ४७५ अपार्टमेंटसची विक्री झाली आहे. या विक्री झालेल्या अपार्टमेंट्सची एकूण किंमत शंभर कोटी रुपये आहे’, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे.  

‘व्हॅस्कॉनने नुकताच दर्जेदार, परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात प्रवेश केला असून, तळेगावजवळ काटवी येथे  ‘गुडलाईफ’ हा प्रकल्प दाखल केला आहे. या प्रकल्पातील पाचशे घरांच्या नावनोंदणीचे काम पहिल्या टप्प्यात करण्यात येणार होते. त्यास मिळालेल्या अप्रतिम प्रतिसादामुळे, आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम यापूर्वी ठरविलेल्या दिवसापेक्षा अगोदरच सुरू करण्याचे कंपनीने ठरविले आहे’, असे व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक सिध्दार्थ वासुदेवन यांनी सांगितले.
 
‘जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि द्रूतगती महामार्गापासून जवळ; तसेच आयटी कंपन्या आणि विविध उद्योग यांच्या जवळच हा प्रकल्प आहे.सुमारे दहा एकर जागेतील या प्रकल्पात वनरुम किचन, एक आणि दोन  बीएचकेचे फ्लॅट्स केवळ परवडणाऱ्या दरांतच नव्हे, तर दर्जेदार स्वरुपात ‘व्हॅस्कॉन’ने सादर केले आहेत. मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय प्रकल्पाच्या आवारातच उभारून ‘व्हॅस्कॉन’ने एक नवीन सुरुवात केली आहे. ‘गुडलाईफ’मध्ये विविध सोयी-सुविधा असून त्यांत सर्व वयोगटांचा विचार करण्यात आला आहे. अभ्यासासाठी वाचनालय असून त्याखेरीज ग्रंथालय संगणकांची उपलब्धता असलेले विशेष कक्ष बांधण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात सहा व अकरा मजली इमारती उभारून सुमारे ५०० घरे सादर करण्यात येणार आहेत’, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Santosh Gaikwad About 341 Days ago
I am interested
0
0

Select Language
Share Link
 
Search