Next
३२ वर्षांनंतर ‘मामला चोरीचा’ पुन्हा रंगमंचावर
प्रेस रिलीज
Wednesday, June 20, 2018 | 05:13 PM
15 0 0
Share this storyमुंबई : लेखक वसंत सबनीस यांनी लिहिलेले स्वतंत्र सामाजिक विनोदी नाटक तब्बल ३२ वर्षांनंतर पुन्हा एकदा नव्या रूपात रंगभूमीवर येत आहे. श्री साई प्रॉडक्शन व स्पंदनची निर्मिती असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन मंगलदास माने यांनी केले आहे. २४ जून रोजी सातारा रोडवरील आण्णाभाऊ साठे नाट्यगृहात हा प्रयोग रंगणार आहे.

‘मामला चोरीचा’ या नाटकाचा पहिला प्रयोग दिनांक सहा मे १९८५ रोजी पुण्यातील बालगंधर्व नाट्यमंदिरात झाला होता. दामू केंकरे दिग्दर्शित या नाटकामध्ये शरद तळवळकर, अश्विनी देसाई यांनी भूमिका साकारल्या होत्या. या नव्या रूपातील नाटकात आदर्श गायकवाड, सागर पवार, संजय देवळे, केतकी लांडे, ऐश्वर्या कुलकर्णी, संजय चव्हाण आणि विद्या भागवत हे कलाकार असणार आहेत. दिग्दर्शक मंगलदास माने यांनी यापूर्वी ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘सखाराम बाइंडर’, ‘ह्यांचं हे असंच असतं’, ‘जमलं बुवा एकदाचं’ या नाटकांचे दिग्दर्शन केले होते.

सबनीस यांच्या ‘मामला चोरीचा’ या नाटकामध्ये नवऱ्याला मुठीत ठेवणारी पत्नी आणि एकूणच घराला जेरबंद करणाऱ्या कमलादेवी शेलार यांची जिरवण्याचा प्रयत्न खूपच सुंदररित्या रंगवलेला आहे. कमलादेवींचा घरात दरारा असल्यामुळे त्यांचे पती भाऊराव, मुलगा शंतनू आणि मुलगी शीतल हे तिघेही कमलादेवीच्या अधिकाराखालील हुकूमशाहीत वावरत असतात. त्यातच शीतलचे विजयशी आणि शंतनूचे अनिताशी प्रेमसंबंध असतात; पण आपल्या प्रेमाला कमलादेवींच्या घरात काहीही थारा मिळणार नाही, हे ते दोघे जाणतात; पण आयुष्यभर बायकोच्या हुकूमशाहीला त्रासलेले भाऊरावच बंडाच्या दिशेने पाउल उचलतात. कमलादेवींच्या विरोधात घरातील सर्व लोक खूप कटकारस्थाने रचतात; मात्र त्यापुढे कमलादेवी हार पत्करतात की त्यावर मात देतात हे प्रेक्षकांना नवीन नाट्यप्रयोगात पहायला मिळणार आहे. कालांतराने दैनंदिन कौटुंबिक जीवनात झालेले बदल या नवीन नाटकात दाखवण्यात आलेले आहे.

दिग्दर्शक माने म्हणाले, ‘पिढ्यानपिढ्या बदलल्या, तरी कुटुंबातील आई ही आईच असते. आजच्या पिढीमध्ये आईची भूमिका बदलत चालली आहे. आईने आपल्या मुलांना किती सवलत द्यावी की धाकात ठेवावे हा विचार समाज करीत आहे. अशातच वसंत सबनीस यांच्या ‘मामला चोरीचा’ यावर नव्या रूपात हे नाटक रंगमंचावर सादर करण्याची कल्पना सुचली. त्यासाठी मृणाल माने व सीमा गायकवाड या निर्मात्या म्हणून लाभल्या; तसेच मोहन कुलकर्णी यांनी मनोरंजन संस्थेतर्फे नाट्यप्रयोगाचे व्यवस्थापन उत्तमरित्या पाहिले. त्यामुळेच हे नाटक आज ३२ वर्षांनंतर प्रेक्षकांना पहायला मिळत आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link