Next
‘दे आसरा’तर्फे दहा हजार उद्योजकांना साह्य
प्रेस रिलीज
Monday, January 21, 2019 | 03:29 PM
15 0 0
Share this story

मुंबई : पंचवीस हजार उद्योजकांना २०२० पर्यंत साह्य करण्याच्या उद्देशाने ना नफा तत्वावर काम करणार्‍या दे आसरा फाउंडेशनचा डिसेंबर २०१८ पर्यंत दहा हजारांहून अधिक उद्योजकांनी फायदा घेतला. फूड, फॅशन, ब्युटी या आणि अशा विविध क्षेत्रांतील उद्योजकांचा यामध्ये समावेश आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भरघोस कामगिरी केलेल्या डॉ. आनंद देशपांडे यांनी २०१५ मध्ये दे
आसरा फाउंडेशनची स्थापना केली. उद्योजकांना व्यवसाय सुरू करताना, चालवताना आणि वाढवताना लागणार्‍या विविध सेवा उपलब्ध करून देऊन जास्तीत जास्त उद्योजकांना साह्य करणे हे ‘दे आसरा’चे उद्दिष्ट आहे. व्यवसायाचा आराखडा तयार करण्यापासून ते कायदेशीर बाबींची पूर्तता करणे किंवा व्यवसायासाठी कर्ज हवे असल्यास त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट करून देण्यापर्यंतच्या या सुविधा माहिती, मार्गदर्शन आणि सेवा या माध्यमातून दिल्या जातात.

या विषयी बोलताना डॉ. देशपांडे म्हणाले, ‘आपल्या आयुष्याच्या उभारणीत मोलाचा वाटा असलेल्या समाजाला आपण शक्य असेल त्या मार्गाने परत द्यायला हवे. ‘शिका, कमवा, आणि समाजाला परत द्या’ ही उत्तम आयुष्याची त्रिसूत्री आहे.’

समाजाला परत देण्याच्या याच उद्देशाने डॉ. देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सोनाली यांनी उद्योजकांना आवश्यक अशा सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणार्‍या दे आसरा फाउंडेशनची स्थापना केली. यामध्ये योग्य शुल्क आकारून उद्योजकांना आवश्यक त्या सेवा देणारे व्यावसायिक मेंटर्स, उद्योगमित्र आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणार्‍या उद्योजकांसाठी ७० प्रकारच्या विविध उद्योगांचा अभ्यास करून बनवलेल्या मार्गदर्शक पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध आहे. बेकरी, केटरिंग, फॅशन, टेलरिंग, सलोन्स, या आणि अशा प्रकारच्या व्यवसायांचा यामध्ये समावेश आहे.

‘दे आसरा’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा गोडबोले म्हणाल्या, ‘नवीन उद्योजकांना तसेच सध्या व्यवसाय चालवत असलेल्या उद्योजकाना सर्वतोपरी साह्य करत त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देशाला नवीन अर्थक्रांतीकडे घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे.’

व्यवसायाचा आराखडा तयार करण्यापासून ते कायदेशीर बाबींची पूर्तता, कर्जासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट, मार्केटिंगसाठी आवश्यक बाबींची पूर्तता, या व अशा अनेक सेवा ‘देआसरा’मध्ये माहिती, साधने आणि सेवा पुरवठादार यांच्या माध्यमातून दिल्या जातात. उद्योजकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा असलेला व्यवसाय उत्तमरितीने चालवण्यासाठी आवश्यक त्या सर्व सेवा ‘दे आसरा’मध्ये एकाच छताखाली उपलब्ध आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link