Next
कुस्ती स्पर्धेचा मानकरी आदर्श गुंड
प्रेस रिलीज
Tuesday, January 09, 2018 | 12:31 PM
15 0 0
Share this article:

पुणे : खेड तालुक्याचा पैलवान आदर्श गुंड हवेली अजिंक्या कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. खुल्या गटातून आदर्श गुंडने ८-३ ने मुळशीचा पैलवान तानाजी झुंजुरके विरुद्ध मात देत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून रोख ५१ हजार रुपये आणि चांदीची गदा देऊन आदर्शला गौरवण्यात आले.

‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेनंतर महाराष्ट्रातील कुस्ती स्पर्धेला हवेली केसरी कुस्ती स्पर्धेने सुरुवात होत असल्याने ही स्पर्धा मानाची समजली जाते. हवेली तालुका कला क्रीडा व सामाजिक संस्था आयोजित निमंत्रितांसाठी मॅटवरील ‘हवेली अजिंक्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०१८’ धायरी येथे आयोजित केली होती.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे व भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचीक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले, तर आमदार भीमराव तापकीर आणि श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, सुवर्णयुग बॅंकेचे संचालक बाळासाहेब रायकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी स्पर्धेचे आयोजक पैलवान भरत चौधरी यांच्यासह भीमराव वांजळे, बाबूराव थोपटे, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, हिंदकेसरी गणपतराव आंधळकर, नगरसेवक हरिदास चरवड, राष्ट्रपती पदक विजेते पैलवान कैलास मोहोळ, राहुल पोकळे, शुक्रचार्य वांजळे, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार उपस्थित होते. महिला कुस्ती स्पर्धेच्या पंचाची कामगिरी एनआयएस कुस्ती कोच आश्विनी बोऱ्हाडे यांनी केली.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार व पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने या स्पर्धा दरवर्षी भरविल्या जातात. यंदा स्पर्धेचे सहावे वर्ष आहे. पुरुष आणि महिला गटाबरोबरच १४ वर्षांखालील कुमार गट देखील या स्पर्धेत सहभागी झाले होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search