Next
गोवर व रुबेला लसीकरण जागृतीसाठी ‘लायन्स’चा पुढाकार
शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोहिम राबवणार
BOI
Monday, December 03, 2018 | 04:43 PM
15 0 0
Share this article:

गोवर व रुबेला लसीकरण जनजागृतीबाबत माहिती देताना रमेश शहा. डावीकडे एलिझाबेथ स्मिथ आणि हेमंत नाईक

पुणे : ‘केंद्र सरकारने हाती घेतलेल्या गोवर व रुबेला लसीकरण (एमआर) या महत्त्वाकांक्षी मोहिमेला समाजातील सर्व स्तरांत पोहोचवण्यासाठी लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल संघटनेतर्फे पुढाकार घेतला आहे. नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटांतील बालकांना ही लस देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ‘लायन्स क्लब्ज’ विविध माध्यमांतून जागृती करणार आहे,’ अशी माहिती ‘लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २’चे प्रांतपाल रमेश शहा यांनी दिली.

गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेच्या जनजागृतीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी ‘लायन्स क्लब्ज’च्या आंतरराष्ट्रीय संचालिका एलिझाबेथ स्मिथ, ‘एमआर’ जनजागृती मोहिमेचे प्रमुख लायन हेमंत नाईक व इतर सभासद उपस्थित होते. गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेसाठी ‘लायन्स क्लब्ज’ फाउंडेशनकडून ५० लाख रुपयांचा निधी आला आहे. त्यात स्थानिक पातळीवर १५ लाखांचा निधी दिला जाणार असून, या मोहिमेला आदिवासी पाड्यांपासून ते शिक्षित वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी लायन्स संघटना प्रयत्न करणार आहे.
    
अधिक माहिती देताना शहा म्हणाले, ‘केंद्र सरकारने गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेला २७ नोव्हेंबर २०१८ पासून प्रारंभ केला आहे. ही मोहिम समाजातल्या तळागाळातील वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाकडून लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल या राष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठ्या सामाजिक संघटनेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील लायन्स क्लब्ज सरसावले आहेत. ‘३२३४ डी २’ या प्रांतातील लायन्स क्लब्जनी गोवर व रुबेला लस देण्यासाठी विविध उपक्रम घेतले जाणार आहेत.’

‘या मोहिमेत आमच्या प्रांतातून पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील १३५ क्लब सहभागी होणार आहेत. विविध शाळांमध्ये जाऊन पालक-शिक्षकांच्या बैठका घेऊन त्यांना या लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉक्टरांची टीम आम्हाला सहकार्य करीत आहेत. त्याशिवाय जाहिरात, रेडिओ-वृत्तपत्रांतून प्रसिद्धी, होर्डिंग, पत्रके, बॅनर्स, मोबाइल व्हॅन, सोशल मीडियाच्या मदतीने या मोहिमेची जनजागृती केली जाणार आहे,’ असे शहा यांनी सांगितले.

एलिझाबेथ स्मिथ म्हणाल्या, ‘सामाजिक जाणीवेतून हे काम होत आहे. वंचित वर्गातली मुलांपर्यंत हे लसीकरण पोहोचावे, यासाठी लायन्स सभासद मेहनत घेत आहेत, याचा आनंद वाटतो. राज्यातील विविध लायन्स प्रांतांना भेटी देऊन लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देणार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search