Next
राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलचा निकाल १०० टक्के
प्रेस रिलीज
Thursday, May 09, 2019 | 11:27 AM
15 0 0
Share this article:

पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरलेल्या पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या यशाबद्दल माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे तसेच पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांचेही अभिनंदन करून शाळा स्थापनेपासून आजपर्यंत सलग शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 

‘सीबीएसई’ बोर्डाने दहावीचे निकाल नुकतेच घोषित केले आहेत. आर्थिक दुर्बल घटकांसाठी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांच्या पुढाकाराने आणि महापालिकेच्या माध्यमातून सुरू केलेल्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलने यंदाही निकालात बाजी मारली आहे. सलग पाच वर्षे दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के  निकालाची परंपरा कायम राखली आहे. एकूण ५५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सृष्टी चिंतल (८७ टक्के), आदर्श दोंतुल (८२.८), प्रियंका मिसाळ (८२.६) यांसह सर्वांनी उत्तम गुण प्राप्त करीत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. या पूर्वी या शाळेतील विद्यार्थी ‘जेईई मेन्स’, ‘आयआयटी’ या परीक्षांमध्ये टॉपर आले आहेत. तर नासासाठी विद्यार्थ्यांचीही निवड झालेली आहे. 

या यशाबद्दल बोलताना माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले, ‘गरीब वर्गातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या शाळेची स्थापना आठ वर्षांपूर्वी पालिकेच्या माध्यमातून झाली. प्रत्येक परीक्षेत निकालाची शंभर टक्के परंपरेमुळे ही शाळा नावारूपास आली आहे. दहावीचे वर्ग सुरू होऊन आज सलग पाच वर्षे निकाल १०० टक्के लागत आहे. सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षक, महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो; मात्र या शाळेसाठी ज्या-ज्या बाबी आवश्यक आहेत, मुख्यत्वे कायमस्वरूपी शिक्षकांचा प्रश्नाकडे आता पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. जेणेकरून आणखी घवघवीत यश मिळेल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search