Next
पुण्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
नगरसेविका मंजूषा नागपुरे व शिवसमर्थ प्रतिष्ठानचा उपक्रम
प्रेस रिलीज
Monday, June 24, 2019 | 12:06 PM
15 0 0
Share this article:


पुणे : नगरसेविका मंजूषा नागपुरे आणि शिवसमर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड रस्त्यावरील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. 

तळागाळातील घटकांपर्यंत मदत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम दर वर्षी प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येतो. यंदा या उपक्रमाचे दहावे वर्ष आहे. वही, दप्तर, राष्ट्रहित प्रबोधनपर पुस्तके व इतर शालेय साहित्याचा यामध्ये समावेश होता. या उपक्रमासाठी सेवा सहयोग, निरामय संस्था यांचे विशेष सहकार्य लाभले.


‘होतकरू व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आम्ही हा प्रयत्न गेली १० वर्षे करत आहोत. हे शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू हीच आमच्या कामाची पावती आहे,’ असे नागपुरे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vivekanand Date, ganesh mala, pine 30 About 105 Days ago
Very good initiative.
0
0

Select Language
Share Link
 
Search