Next
विद्रोही कवी बुद्धराज गवळींना कविसंमेलनाद्वारे शुभेच्छा
मिलिंद जाधव
Tuesday, September 25, 2018 | 04:36 PM
15 0 0
Share this article:



कल्याण :
आपल्या कवितेतून विविध विषयांवर प्रबोधन करणारे विद्रोही कवी बुद्धराज अर्जुनराव गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या राहत्या घरी कल्याण येथे गर्दी केली. त्या वेळी कवी, कवयित्रींच्या वतीने कविसंमेलन घेण्यात आले. 

साहित्यिक जगदेव भटू यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन झाले. साहित्यिका संजीवनी राजगुरू, साहित्यिक विजयकुमार भोईर, शाहीर रामदास इंगळे, कवयित्री सुरेखा गायकवाड, मनीषा मेश्राम, नवनाथ रणखांबे, हरिश्चंद्र धिवार, प्रकाश वानखेडे, अनिल शिंदे, सुभाष राजगुरू, मिलिंद घायवट, चंद्रसेन जाधव, विजय जाधव, मिलिंद जाधव यांनी विविध विषयांवर दर्जेदार कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन कवी नवनाथ रणखांबे यांनी केले. उपस्थित कवींनी बुद्धराज गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. 

‘जे मला सुचले, ते मी लिहीत गेलो. कवितेतून नेहमीच मी सत्य मांडण्याचा प्रयत्न करीत आलेलो आहे. माझ्या विद्रोही कविता अनेक नागरिकांना आवडायला लागल्या असून, माझे चाहते वाढले आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत विविध विषयांवर दर्जेदार कविता मी आपल्यापर्यंत पोहोचवीन,’ असे सांगून आलेल्या सर्व कवींचे गवळी यांनी आभार मानले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search