Next
जेष्ठ गायक श्रीकांत पारगावकर यांच्या 'मनी जे दाटले' ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा चित्रपट, संगीत आणि साहित्यातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत संपन्न..!!
BOI
Thursday, February 09, 2017 | 09:45 AM
15 1 0
Share this article:

जेष्ठ गायक श्रीकांत पारगावकर यांनी लिहिलेल्या 'मनी जे दाटले' या आत्मचरित्राचे प्रकाशन जेष्ठ गायक, संगीताचे अभ्यासक पं. सत्यशील देशपांडे यांचे हस्ते झाले. पुण्यात ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या या समारंभात जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि सुप्रसिद्ध लेखिका डॉ. वीणा देव हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

प्रकाशन समारंभाच्या सुरुवातीला सूत्रसंचालक अरुण नूलकर यांनी मान्यवरांचे तसेच उपस्थितांचे स्वागत केल्यावर प्रकाशक बुकगंगा डॉट कॉम चे सर्वेसर्वा, अमेरिका स्थित, मंदार जोगळेकर यांनी आपल्या मनोगतात अशा पुस्तकांची आवश्यकता प्रतिपादन केली. ते म्हणाले, बुकगंगा आपल्या माध्यमातून ही पुस्तके प्रकशित करून ती जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यामुळेच आज ‘मनी जी दाटले‘ ची ई-आवृत्तीसुद्धा प्रकाशित होणार आहे! यानंतर मंदार जोगळेकरांनी समारंभाचे अध्यक्ष पं. सत्यशील देशपांडे, प्रमुख अतिथी डॉ.जब्बार पटेल, प्रमुख वक्त्या डॉ.वीणा देव, लेखक श्रीकांत पारगावकर आणि पुस्तक निर्मितीत बहुमोल सहाय्य करणाऱ्या अभ्यासक सुलभा तेरणीकर या सर्वांना भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

'मनी जे दाटले' चे लेखक, गायक श्रीकांत पारगावकर यांनी पुस्तक लिहिण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली. ”मागील सुमारे ४०-४५ वर्षातील आपली शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, पार्श्वगायन, नृत्यासाठी साथीचे गायन, नाट्यसंगीत आणि शिवाय मेलडी मेकर्स या वाद्यवृंदातील गायन तसेच संगीत नाटकातील अभिनय हे सर्व शब्दबध्द करावेत, त्यानिमित्ताने एक इतिहास सांगितला जाईल आणि तो एक दस्तऐवज तयार होईल हा कविमित्र सुधीर मोघे यांचा आग्रह होता, त्यातून हे लेखन झालं” असं ते म्हणाले.“ आज त्यांची उणीव फार जाणवत असल्याची खंत ही पारगावकरांनी व्यक्त केली. आपल्या आजवरच्या यशाचे श्रेय त्यांनी पत्नी  सौ. प्रभा यानां दिले.

पुस्तक प्रकाशनानंतर प्रमुख अतिथी आणि वक्त्या डॉ. वीणा देव यांचे भाषण झाले. त्या म्हणाल्या, “पारगावकरांची, खर तर बुवांची, कारण मी त्यांना बुवा म्हणते, आणि आमची गेल्या ४० वर्षांची मैत्री आणि घरगुती संबंध आहेत. त्यांच्या-आमच्या सर्व चांगल्या-वाईट प्रसंगात आम्ही एकमेकांबरोबर असतो. गायक म्हणून त्यांची सर्व वाटचाल मी अनुभवली आहे. ‘आणिले टिपूनी अमृतकण’ या गदिमा  गीतांच्या, सुधीर मोघेने योजलेल्या कार्यक्रमात आम्ही चक्क सहगायक होतो! त्यांनी पत्नी प्रभा ही माझी कॉलेज मैत्रीण, त्यामुळे हे स्नेहबंध अधिकच दृढ झाले! बुवांच हे आत्मचरित्र त्यांच्या गाण्याइतकच छान जमलंय! वाचनीय झालंय, कुठेही, आत्मचरित्रात बऱ्याच वेळा असतो तसा पाल्हाळीकपणा नाही. त्यामुळे एका कलाकाराची पाय जमिनीवर ठेऊन केलेली, झालेली जडणघडण त्यातून कळते!”

प्रमुख अतिथी डॉ. जब्बार पटेल आपल्या भाषणात म्हणाले, “श्रीकांत पारगावकरांनी आपल्या गाण्यातून संगीतातली अभिजातता कायम ठेवली. संगीतकार भास्कर चंदावरकरांनी आरती प्रभूंच्या काव्यावर आधारीत ‘नक्षत्रांचे देणे’ बऱ्याच वर्षापूर्वी केला, त्यातही श्रीकांत चमकला होता, नंतर मेलडी मेकर्स मधून आणि पुढच्या काळात स्वत:च्या 'फिर वही श्याम 'या तलत मेहमूद -यांच्या गाण्यांचा पुन:प्रत्ययाचा आनंद तो स्वत:च्या खास वैशिष्ठ्यांसह देत असतो. "रवींद्र साठे ऐवजी कोलकत्याच्या 'घाशीराम कोतवाल' दौऱ्यात आयत्यावेळी बोलावून सुद्धा पारगावकरांनी तिथे कशी बाजी मारली ही आठवणसुद्धा डॉ. पटेल यांनी सांगितली.

एका गायकाच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचे औचित्य साधून अध्यक्ष पं. सत्यशील देशपांडे यांनी संगीताबाबत, त्यातील काही वृत्तींबाबत आपले परखड विचार व्यक्त केले. ते म्हणाले, "घराण्यातील गायकी शिकताना केवळ त्यातल्या तांत्रिक बाबी जाणून न घेता ते घराणे ज्या प्रदेशातील आहे, तो प्रदेश, तेथील जीवनमान आणि भाषा जाणून घेतली पाहिजे. भाषेतील सौन्दर्य, त्यातील संदर्भ, गायक स्वतः अनुभवतो त्याच वेळी त्याला गाणे फुलवता येते. हल्ली गायक कमी वाचतात. ते केवळ जाहिरातीतील स्वतःच्या नावाचा टाईप आणि चेक वरील स्वतःचे नाव एवढेच वाचतात. बंदिशीतील शब्दांबाबत ते उदासीन असतात. आम्ही शब्दांच्या पलीकडले आहोत ही मिजास वर असते. "ते पुढे म्हणाले, प्रायोजक हि जमात संगीताच्या कार्यक्रमातून शक्तीप्रदर्शन करीत असते. अशाने गाणे फुलवण्यासाठी योग्य वातावरण रहात नाही"! "घराण्याची मूल्य संक्रांत होताना कलावंताने केवळ गुरुचे अनुकरण करायचे नसते" असही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या पूर्वार्धाच्या शेवटी आभार व्यक्त करताना बुकगंगाच्या मंदार जोगळेकरांनी 'मनी जे दाटले' या पुस्तकाची श्राव्य आवृत्तीही तयार करणार असल्याचे सांगितले. प्रकाशन समारंभाच्या उत्तरार्धात झालेल्या श्रीकांत पारगावकरांच्या सांगितिक मुलाखती दरम्यान त्यांनी 'गुरु एक जगी त्राता',  'जोग रागातील बंदिश',  'मग माझा जीव तुझ्या' आणि रसिकांच्या आग्रहाखातर तलत मेहमूद यांची 'शुक्रिया ऐ प्यार' (चित्रपट 'आराम') आणि 'हमसे आया ना गया' ('देख कबीरा रोया') हि गाणी सादर करून कार्यक्रमाची सांगता सुधीर मोघ्यांच्या 'भेटशील केव्हा, माझिया जिवलगा, या गीताने केली.
आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाने आणि मुलाखतीतील मार्मिक प्रश्नांनी निवेदक अरुण नूलकर यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.

'मनी जे दाटले' ह्या पुस्तकाची प्रिंट कॉपी किंवा ई-बुक एका क्लिकवर घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ganesh Godik About
Nice
0
0
Sanjay Sawant - Mumbai About
Lack of words to express greatness of this genius Shri Shrkantji Pargaokar. His singing not only brings solace to your mind but takes us to a different pedestal where everything is sublime. Congratulations to his new achievement !!
0
0
Sanjeev Gawate (Indore) About
Shrikant Pargaonkar ji , till date I have herd your various styles, singing n stories verbally from you. This time you have made an opportunity to read your life time experiences and Man ki baat, as a single package, definitely we would like to read , I am sure it will be great asset for us n blessings too.
0
0

Select Language
Share Link
 
Search