Next
व्यंगचित्रे, छायाचित्रांतून उलगडणार ‘पुलं’चे जीवन
सात ते नऊ नोव्हेंबर दरम्यान प्रदर्शनाचे आयोजन
BOI
Friday, November 02 | 04:09 PM
15 0 0
Share this story

पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनाबाबात माहिती देताना कैलास भिंगारे, सुनील महाजन कृष्णकुमार गोयल व मुरलीधर मोहोळ.

पुणे : ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांच्या जीवनातील विविध पैलूंमधून त्यांचे व्यक्तिमत्व उलगडणाऱ्या व्यंगचित्रांचे आणि त्यांच्या दुर्मिळ फोटोबायोग्राफीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. साहित्यवेध प्रतिष्ठान, संवाद पुणे आयोजित आणि कोहिनूर ग्रुप प्रायोजित हे प्रदर्शन दि. सात ते नऊ नोव्हेंबर दरम्यान कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात  भरविण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी सहा या वेळेत हे प्रदर्शन पुणेकरांना पाहण्यासाठी खुले असणार आहे’,अशी माहिती साहित्यवेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास भिंगारे आणि संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी, दि. सात  नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी, दि. ८ नोव्हेंबर रोजी पहाटे सहा  वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘आनंदयात्रा’ हा दिवाळी पहाट कार्यक्रम होणार आहे.

‘‘पुलं’चा जीवनप्रवास उलगडणारे आणि त्यातून खळखळून हसवणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, तरी सर्व रसिक-साहित्यिक प्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा’, असे आवाहन  कैलास भिंगारे आणि सुनील महाजन यांनी केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link