Next
वेब सिरीजमधून उलगडणार स्त्री जीवनाचा झगडा
BOI
Wednesday, December 19, 2018 | 06:35 PM
15 0 0
Share this story


आजही ज्या दुनियेत स्त्री आणि पुरुष यांना वेगवेगळ्या पद्धतीने जोखले जाते, अशा जगात स्वतःच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या एका स्त्री ची कहानी ‘वूट’ अॅपवरून वेब सिरीजच्या माध्यमातून प्रसारित केली जात आहे. ‘इट्स नॉट दॅट सिंपल’ या नावाने हा शो प्रसारित केला जात असून अभिनेत्री स्वरा भास्कर या शोमधील प्रमुख चेहरा आहे. १४ डिसेंबरपासून ही वेब सिरीज प्रकाशित करण्यात येत आहे. 

‘तो’ विरुद्ध ‘ती’ अशी लढाई दररोज लढणाऱ्या आणि घटस्फोटित असताना या सगळ्या आयुष्याच्या कसरतीतून मार्ग काढणाऱ्या मीरा वर्मा या महिलेची ही गोष्ट आहे. एक स्त्री, एक मैत्रीण, एक आई, एक जोडीदार अशा वेगवेगळ्या भूमिका जगताना आणि निभावताना तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य यांची कशी सरमिसळ होते आणि याचा तिच्या आयुष्यावर कसा परिणाम होत जातो, याचे जिवंत चित्रण या मालिकेतून मांडण्यात आले आहे. 

समाज पुढारला आहे, असे आपण कितीही म्हणत असलो, तरी स्त्रीचे घरगुती आयुष्य, तिचे करिअर, तिच्या भावना आणि एकंदरीतच तिचे अस्तित्व या सगळ्या गोष्टींमध्ये स्त्री आणि पुरुष यांना वेगळी वागणुक दिली जाते हेदेखील यात दाखवले आहे. अभिनेत्री स्वरा भास्करमुळे मीराच्या या भूमिकेला आणखी जास्त वजन आले आहे. स्वराव्यतिरिक्त सुमीत व्यास, पुरब कोहली, विवान भटेना आणि करणवीर मेहरा या कलाकारांनीही या शोमध्ये सहभागी होऊन शो चे महत्त्व वाढवले आहे. 

‘आत्ताच्या काळातील स्त्री चे संदर्भ देणारी ही मालिका आहे. एक प्रभावी स्त्री व्यक्तीरेखा आणि चार पुरुष व्यक्तिरेखा यात काम करत आहेत. स्त्री असो अथवा पुरुष कोणीही पूर्ण योग्य किंवा पूर्ण अयोग्य नसते. त्यामुळे काही प्रश्नांची उत्तरे शेवटपर्यंत देता येत नाहीत. अशा प्रश्नांच्या शोधात असलेल्या मीराची ही कहानी आहे’, अशी माहिती ‘वूट’च्या कंटेट प्रमुख मोनिका शेरगील यांनी दिली आहे. ‘व्हिक्टर टॅंगो एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ची निर्मिती असलेली ही वेब सिरीज दानीश अस्लम यांनी दिग्दर्शित केली आहे.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link