Next
‘महिंद्रा फार्म’च्या देशांतर्गत विक्रीमध्ये वाढ
प्रेस रिलीज
Monday, August 06 | 01:02 PM
15 0 0
Share this story

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने (एफईएस) जुलै २०१८मधील ट्रॅक्टरविक्रीची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. जुलै महिन्यात देशांतर्गत विक्रीमध्ये २१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

जुलै २०१८मध्ये देशांतर्गत विक्री २१ हजार ५७४ युनिटची झाली, तर जुलै २०१७मध्ये ती १७ हजार ८०४ युनिट होती. जुलै २०१८मध्ये एकूण ट्रॅक्टरविक्री (देशांतर्गत+निर्यात) २२ हजार ६७९ युनिट इतकी झाली, तर गेल्या वर्षी याच काळात ती १८ हजार ९५७ युनिट होती. जुलैमध्ये एक हजार १०५ युनिटची निर्यात करण्यात आली.

कामगिरीविषयी बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या फार्म इक्विपमेंट अध्यक्ष राजेश जेजुरीकर म्हणाले, ‘आम्ही जुलै २०१८मध्ये देशांतर्गत बाजारात २१ हजार ५७४ ट्रॅक्टरची विक्री केली असून, अगोदरच्या वर्षीच्या तुलनेत २१ टक्के वाढ साध्य केली आहे. यंदा मान्सून चांगला होत असल्याने पाण्याचे साठे उत्तम असतील, यामुळे येत्या सणासुदीच्या काळात सकारात्मक वातावरण राहील व ट्रॅक्टरला असलेली मागणी वाढेल. निर्यातीच्या बाबतीत आम्ही एक हजार १०५ ट्रॅक्टरची विक्री केली.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link