Next
‘डॉक्सअॅप’ आता ‘एसडीके’ वैशिष्ट्यासह उपलब्ध
BOI
Monday, December 10, 2018 | 04:33 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतातील वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ‘डॉक्सअॅप’ या अॅप अँड्रॉइड आणि वेबसाइटसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कीट (एसडीके) हे वैशिष्ट्यासह उपलब्ध होणार असून, यामुळे आता वापरकर्त्यांना अॅप डाउनलोड न करताही डॉक्टरांशी संपर्क साधता येणार आहे. त्याचबरोबर डॉक्सअॅप-एसडीके वैशिष्ट्य असलेल्या कोणत्याही वेबसाइट अथवा अॅपवरून स्वतःच्या डॉक्सअॅप खात्याचा वापर करता येणार आहे.

‘एसडीके’मुळे इतर व्यासायिकसुद्धा दुसऱ्या अॅपवर लॉग-इन न करता स्वतःच्या अॅप वरून त्यांच्या ग्राहकांना डॉक्टरी सल्ला मिळवून देऊ शकणार आहेत. या संलग्नीकरणामुळे वापरकर्ते केवळ आठ मिनिटांमध्ये डॉक्टरांशी संपर्क करू शकतात, तसेच घरपोच औषधे, अॅप-चाट, व वैद्यकीय माहिती यांचा लाभ घेऊ शकतात.

याबाबत बोलताना ‘डॉक्सअॅप’चे संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी सतीश कनन म्हणाले, ‘प्रगतीचा पुढील टप्पा गाठण्यात ‘एसडीके’चा खूप मोठा हातभार लागत आहे. यामुळे जास्तीत जास्त जनसंख्येला गरजेनुसार उच्च प्रतीचा डॉक्टरी सल्ला उपलब्ध होत आहे. सुरुवातीपासूनच  भौगोलिक सामाजिक आणि आर्थिक अडथळे दूर करत उच्च प्रतीची डॉक्टरी सेवा उपलब्ध करून देण्यात ‘डॉक्सअॅप’ प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी हे नवीन तंत्रज्ञान अधिकच  उपयोगी पडेल. जे व्यावसायिक त्यांच्या ग्राहकांना वैद्यकीय सेवा देऊ इच्छितात अशा सर्व व्यावसायिकांसाठी आम्ही ‘एसडीके’ तंत्रज्ञान खुले करत आहोत. यामुळे त्यांच्या  ग्राहकांना डॉक्टरांशी सहज संपर्क साधता येईल.’

‘कोणतीही वेबसाइट किंवा मोबाइल अॅप्लिकेशन डॉक्सअॅप-एसडीके तंत्रज्ञान सहज रुजू करून घेऊन शकते. आम्हाला खात्री आहे, की या तंत्रज्ञानामुळे केवळ ‘डॉक्सअॅप’चे वापरकर्तेच नव्हे, तर इतरांनादेखील डॉक्टरी सल्ला डॉक्सअॅप नोंदणीशिवाय प्राप्त करून घेता येईल,’ असे कनन यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search