Next
‘तरुणांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे’
प्रेस रिलीज
Monday, June 04, 2018 | 06:12 PM
15 0 0
Share this article:

कला व हस्तकला प्रदर्शनाच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन करताना मान्यवर

पुणे : ‘एखादी गोष्टी सध्या करण्यासाठी आवड आणि जिद्द महत्त्वाची असते. आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात जिद्दीने काम केले, तर यशाच्या वाटेने आपला प्रवास होतो. त्यामुळे नोकरी किंवा व्यवसाय करताना तरुणांनी आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात करिअर करण्यावर भर द्यायला हवा,’ असे मत माणिकचंद समूहाच्या कार्यकारी संचालक जान्हवी धारीवाल यांनी व्यक्त केले.

लाइफस्टार ग्लोबल वेल्फेअर फाउंडेशन व जयहिंद परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतदर्शन वर्ल्ड सेंटर व आर्टिस्ट ग्लोबल कौन्सिल यांच्या सहकार्याने घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक सभागृहात आयोजित दोन दिवसीय एज्युकेशन बिझनेस जॉब (ईबीजे) फेअरच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

कला व हस्तकला प्रदर्शन पाहताना जान्हवी धारिवाल, सिमरन जेठवानी, माधवी मोरे व इतरया वेळी आयुर जेनिक्स आयुर्वेदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत पाटील, अभिनेत्री माधवी मोरे, ओवायई फाउंडेशनच्या संस्थापिका सिमरन जेठवानी, ज्योतिषतज्ज्ञ राशू हेमल नायक, भारतदर्शन वर्ल्ड सेंटरचे नारायणकुमार फड, ह्युमन वेलफेअर कॉसमॉस ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर, प्रसिद्ध चित्रकार विनय बागडे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

या फेस्टिवलमधून शिक्षण, व्यवसाय आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत; तसेच महाराष्ट्रातील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी कला व हस्तकला प्रदर्शन आयोजिले आहे. विविध मान्यवर तज्ज्ञांनी सेमिनारच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी कलेच्या क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल सुधीर बांगर, लातूर येथील अविनाश सातपुते आणि पश्चिम बंगाल येथील नीलांजना घोष यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

दीपप्रज्वलन करून ईबीजे महोत्सवाचे उद्घाटन करताना मान्यवरधारिवाल म्हणाल्या, ‘भवतालच्या विविध गोष्टींमुळे तरुणांमध्ये संभ्रम असतो. अशावेळी महोत्सवांतून त्यांच्यातील संभ्रम दूर होतो; तसेच त्यांना करिअर निवडीसाठी दिशा मिळते. अनेक संधींची उपलब्धी त्यातून मिळत असल्याने भविष्यात काय करावे, याचे मार्गदर्शन मिळते. महोत्सवातील चित्रे आणि कलाकुसर मन मोहवून टाकणारी आहे.’

सिमरन जेठवानी म्हणाल्या, ‘चित्रांतून प्रत्येक कलाकाराची मेहनत पाहायला मिळते. विविधता आणि विलक्षण रंगसंगती यामुळे हे कलाप्रदर्शन नयन सुखावणारे आहे. शब्दांच्या पलीकडील भावना या चित्रांतून व्यक्त झाल्या आहेत.’

विक्रांत पाटील, डॉ. मधुसूदन घाणेकर, माधवी मोरे, राशू हेमल नायक यांनीही समयोचित मनोगते व्यक्त केली. नारायणकुमार फड यांनी प्रास्ताविक केले. आकांक्षा जोशी यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search