Next
‘अल अदिल’ची दुबईत दोन नवी सुपर स्टोअर्स
प्रेस रिलीज
Friday, November 10 | 05:05 PM
15 0 0
Share this story

‘अल अदील ट्रेडिंग कंपनी’च्या दुबईतील दोन नव्या दालनांचे उद्घाटन विद्या बालन आणि  दिया मिर्झा यांच्या हस्ते झाले, या वेळी  डॉ. धनंजय दातार, वंदना दातार आदी उपस्थित होते.
 दुबई : ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांच्या कुशल नेतृत्वाखाली प्रगती करणाऱ्या ‘अल अदिल ग्रुप’ने दुबईत नुकतीच आणखी दोन सुपर स्टोअर्स उघडली आहेत. या समूहाची आता एकूण ३८ सुपर स्टोअर्सची साखळी आखाती प्रदेशात यशस्वीरित्या कार्यरत झाली आहे. ‘अल अदिल ट्रेडिंग कंपनी’चे ३७ वे स्टोअर दुबईतील अल क्यूसिस या मध्यवर्ती वसाहतीत बैरुत स्ट्रीटवर सुरू झाले आहे. त्याचे उद्घाटन अभिनेत्री दिया मिर्झाच्या हस्ते झाले. ३८वे स्टोअर अल बरशा भागात उघडले असून, त्याचे उद्घाटन अभिनेत्री विद्या बालनच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. धनंजय दातार, त्यांचे कुटुंबीय आणि दुबईतील भारतीय नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


या संदर्भात माहिती देताना ‘अल अदिल ग्रुप’च्या वित्त संचालक वंदना दातार म्हणाल्या, ‘दिया मिर्झा आणि विद्या बालन या केवळ रूपवान अभिनेत्रीच नसून आपल्या व्यक्तिमत्त्वातून भारतीय स्त्रीची अभिव्यक्ती दाखवून देतात. वैविध्यपूर्ण आणि मनावर ठसणाऱ्या भूमिका मेहनतीने साकारून त्यांनी लाखो प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे दृढ स्थान निर्माण केले आहे. नेमके हेच गुणवैशिष्ट्य आमच्या ‘अल अदिल’ ब्रँडचेही असल्याने दुबईतील नव्या स्टोअर्सचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करणे आम्हाला यथोचित वाटले. ही नवी स्टोअर्स दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून उघडण्यात आली आहेत. सणासुदीच्या खरेदीचा आनंद वाढवण्यासाठी आम्ही आमच्या सर्व स्टोअर्समध्ये निवडक उत्पादनांवर अगदी ५० टक्क्यांपर्यंत सवलत देऊ केली आहे.’
 
वडिलांनी दुबईत १९८४ मध्ये सुरू केलेल्या लहानशा दुकानातून सुरुवात करून त्याचे रूपांतर सुपरमार्केट, मसाल्यांचे कारखाने, पीठ गिरण्या व आयात-निर्यात कंपनी असलेल्या जागतिक समूहात करण्यात ‘अल अदिल ग्रुप’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रगतीच्या या टप्प्यावर पोचल्याचा आनंद व्यक्त करताना ते म्हणाले, ‘अल अदील हा ब्रँड सुरवातीपासूनच उत्पादनांची अस्सलता, दर्जा व सुरक्षितता यासाठी ओळखला जातो. आखाती देशांमधील भारतीयांप्रमाणेच बहुसांस्कृतिक समाजांच्या मनात त्याने दृढ विश्वास संपादन केला आहे. या प्रवासात आम्ही कधीही आमच्या मध्यवर्ती मूल्यांशी तडजोड केली नाही. म्हणूनच जगभर मंदीचे वातावरण असतानाही आमच्या कंपनीने भरघोस प्रगतीची घोडदौड कायम ठेवली. यामध्ये आमचे ग्राहक, हितचिंतक आणि कर्मचाऱ्यांचे योगदान अनमोल आहे.’
 
ते पुढे म्हणाले, ‘कोणताही उद्योग यशस्वी व्हायचा असेल तर प्रामाणिकपणा, कष्ट आणि संयम ही त्रिसूत्री अत्यंत महत्त्वाची ठरते. मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही, असा उपरोध मला अनेकदा ऐकून घ्यावा लागला. परंतु मी या  त्रिसूत्रीवर दृढ श्रद्धा ठेवली. कामकाजात पारदर्शकता राखली. त्याचाच परिणाम म्हणजे एका मराठी माणसाच्या छोटेखानी व्यवसायाचे रुपांतर जागतिक समूहात झाले आहे. या वाटचालीत साथ व सदिच्छा देणाऱ्या, तसेच मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचा मी ऋणी आहे.’
 
‘अल अदिल ट्रेडिंग’चे संचालक हृषीकेश दातार म्हणाले, ‘आमचा समूह विस्ताराच्या महत्त्वाच्या टप्प्यात असून बदलत्या काळाचा वेध घेऊन अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही डिजीटल माध्यमांतही मोठी गुंतवणूक करत आहोत. आम्ही नुकतेच अल अदिल ऑनलाइन स्टोअर सुरू केले असून त्याला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच आम्ही आमचे ऑनलाईन रिटेल व्यवसाय प्रारूप बाजारपेठेत आघाडीवर राहण्याच्या दिशेने बदलले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे ‘अल अदिल’च्या ऑनलाइन व स्टोअर्सद्वारे अशा दोन्ही विक्रींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आमचा ग्राहकवर्ग वाढत असल्याचेच ते द्योतक आहे. वर्ष २०२०पर्यंत ऑनलाइन विक्री, स्टोअर्सची संख्या व ग्राहकांची संख्या या तिन्हींमध्ये लक्षणीय वाढ दिसून येण्याची आम्हाला खात्री आहे.’
 
डॉ. धनंजय दातार यांच्या  नेतृत्वाखाली प्रगती करणाऱ्या ‘अल अदिल ट्रेडिंग’ने नऊ हजार भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजच्या घडीला ‘अल अदिल ग्रुप’ची आखाती देशांत ३८ सुपरमार्केट्स, दुबई, अबूधाबी, शारजा व अजमान भागांत पिठाच्या दोन गिरण्या, दोन मसाला उत्पादन कारखाने असे नेटवर्क विस्तारले आहे आणि ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने मुंबई निर्यात विभागही कार्यरत आहे. अल अदील समूह विस्तार करत  असून त्याने नुकतेच ओमान व बहारीनमध्ये नवी आऊटलेट्स उघडली आहेत. कंपनीने अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनया, स्वित्झर्लंड, इटली व एरित्रिया, त्याचप्रमाणे कुवेत, ओमान व युएई या देशांत व्यापारी मार्ग निर्माण करुन विशेष वर्गातील आस्थापनांद्वारे आयात व निर्यात क्षेत्रांतही विस्तार केला आहे.‘अल अदिल’ने आपल्या ‘पीकॉक’ या लोकप्रिय ब्रँडअंतर्गत ७००हून अधिक खाद्यउत्पादने उपलब्ध करून दिली असून, आगामी काळात त्यात आणखी भर पडेल. ‘पीकॉक’ हा मसाल्याचे पदार्थ व तयार मसाल्यांच्या सर्वाधिक मोठ्या ब्रँडपैकी एक असून, त्याच्या संग्रहात सध्या मसाल्यांबरोबरच डाळी, पिठे, लोणची, मुखवास, पापड आणि सुक्या मेव्याचाही समावेश आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link